आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलपातळी 18 फुटांनी घटली; घसरणीत वैजापूर तालुका दुसर्‍या क्रमांकावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- 1972 च्या भीषण दुष्काळातही भूजल पातळी जेवढी खालावली नव्हती तेवढी यंदा खालावली आहे. हे चित्र अत्यंत भयावह आहे. जानेवारी संपून फेब्रुवारी जेमतेम सुरू झाला असतानाच औरंगाबाद शहरासह तालुक्याची जलपातळी गतवर्षीच्या तुलनेत 18 फुटांनी अधिक खोल घसरली आहे.

काही ठिकाणी पाचशे फुटांपर्यंत बोअर घेण्यात आले असल्याने येत्या काळात ही पातळी आणखी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डोंगराळ भाग असलेल्या कन्नड तालुक्याचे चित्र त्यापेक्षा भीषण असून तेथील पातळी थेट 23 फुटांनी घसरली आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा विचार करता खुलताबाद येथील चित्र थोडे समाधानकारक आहे. येथील पाणीपातळी 8 फुटांनी खालावली असून जिल्ह्यात पातळी खालावण्याचे कमी प्रमाण याच तालुक्याचे आहे. जायकवाडी प्रकल्प उशाशी असलेल्या पैठण तालुक्याचे चित्र यापेक्षाही विदारक आहे. जलपातळी घसरण्याच्या क्रमवारीत कन्नड पुढे, तर औरंगाबाद आणि वैजापूर तालुका क्रमांक दोनवर आहे.

ऑक्टोबरमध्ये तीन मीटरने घसरण
ऑक्टोबरमध्ये भूजल सर्वेक्षण करण्यात येते. तेव्हा पाणी पातळी जर एक मीटरने कमी झाली तर एप्रिलनंतर परिसरात पाणीटंचाई जाणवेल, असे गृहीत धरले जाते. याच वेळी पातळी जर 2 मीटरपर्यंत खालावली तर जानेवारी महिन्यापासूनच टंचाईचे संकेत येतात आणि ऑक्टोबर महिन्यातच जर पातळी 3 मीटरपेक्षा खालावली तर तत्क्षणी दुष्काळी परिस्थिती असल्याचे गृहीत धरले जाते. यंदा ऑक्टोबरमध्येच पाणी पातळी तीन मीटरने खाली गेली होती. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त असल्याचे स्पष्ट होते. पावसाळ्यापूर्वी मे, पावसाळ्यानंतर ऑक्टोबर, जानेवारी आणि मार्च असे वर्षातून चार वेळा हे सर्वेक्षण केले जाते. जिल्ह्यातील 52 पाणलोट क्षेत्रात हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.


असे आहे चित्र

यंदा मागील फरक

औरंगाबाद 40 22 18

फुलंब्री 36 20 16

पैठण 37 26 11

गंगापूर 40 30 13

वैजापूर 52 34 18

खुलताबाद 41 33 08

सिल्लोड 37 22 15

कन्नड 47 24 23

सोयगाव 25 13 12

सरासरी 39 24 15

बेसुमार उपसा हेच पातळी खालावण्याचे मुख्य कारण आहे. त्या तुलनेत जलपुनर्भरण होत नाही. जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया शहरात जवळपास ठप्प झाली आहे. प्रत्येक इमारतीवर जलपुनर्भरण अनिवार्य करणे, ग्रामीण भागात शेततळी, लहान बंधारे उभारण्याची गरज आहे. सिमेंटचे रस्ते आणि पेव्हर ब्लॉक बसवण्याला र्मयादा घालण्याची गरज आहे.
-शरद भोगले, जलतज्ज्ञ.