आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : पाण्यातून शाळेकडे जीवघेणी वाटचाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगाव अर्ज - फुलंब्री तालुक्यातील दत्तवाडी ते बोरगावअर्ज दरम्यानचा पाच किलोमीटरचा भोराडी नदीतून जाणारा रस्ता पावसाळ्यात विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा बनला आहे. पाच किलोमीटरच्या रस्त्यात एक नदी व नाला लागतो. दोन्हीवर पूल नसल्याने मुलांना थेट पाण्यातून वाटचाल करावी लागते. दत्तवाडी येथे चौथीपर्यंत शाळा असून पुढील शिक्षणासाठी मुलांना नदी ओलांडून जीव धोक्यात घालून शाळेला जावे लागते. चिखल तुडवीत गुडघ्यावर असलेल्या पाण्यातून शाळेकडे मुलांना वाटचाल करावी लागत आहे. एकीकडे शासनाच्या वतीने मुलांच्या शिक्षणासाठी विविध सोई पुरवण्यासाठी कोट्यवधींचा निधी दिला जात असला तरी आज अाधुनिक महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मुलांची शिक्षणासाठी फरपट होत आहे.
रुग्णांची गैरसोय : फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज परिसरातील ही सर्वात मोठी वस्ती असून येथून सिल्लोडकडे जाण्यासाठी पेंडगाव, बोरगाव, कायगाव येथील नागरिकांना हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे. सध्या पावसाळ्याचे िदवस असल्याने रस्ता पुर्ण चिखलमय व जलमय झाला आहे. वस्तीवर गावातून वाहन जात नसल्याने रात्री- बेरात्री रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी मोठ्या अडचणी होतात. अाधी रुग्णाला बैलगाडीतून बोरगावला आणून तेथून वाहनात तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयात न्यावे लागते.
पर्यायी व्यवस्था प्रशासनाने करावी
^बोरगावअर्ज कडे जाणारा रस्ता जीवघेणा बनला असून रुग्ण व विद्यार्थ्यांचे मार्गावरून पाण्यातून जाताना मोठी कसरत करावी लागते. तरी यावर पुल बांधावा किंवा पर्यायी व्यवस्था करावी.
- पारूबा काळे, ग्रामस्थ
७५ मुले दत्तवाडीचे शिक्षणासाठी पाण्यातून बोरगावला जातात
४०० लोकसंख्येची दत्तवाडी वस्ती फुलंब्री तालुक्यात
०२ वर्षांपूर्वी लोकसहभागातून केलेल्या रस्त्याला पाणदीचे स्वरूप
४०० ते ५०० ग्रामस्थांची मार्गावर दररोज ये- जा
बातम्या आणखी आहेत...