आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जायकवाडीत ओघ वाढला, पाणीसाठा २९ टक्क्यांवर, सिंचनाचा प्रश्न सुटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - जायकवाडीधरणामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे वरील धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी सुरू असल्याने जायकवाडीचा पाणीसाठा गुरुवारी सायंकाळ पर्यंत २९ टक्क्यांवर आला आहे. हजार ३५० क्युसेक प्रतितास वेगाने पाणी जायकवाडीत दाखल होत असून वरील भागातील सर्व धरणे भरली आहेत.

पुढील काही दिवसांत पावसाचा वेग वाढला तर वरील धरणांमधून जायकवाडीत अचानक पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जायकवाडी परिरसरात २००६ च्या प्रमाणे पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. याचा विचार करून वरील धरणातून आताच पाणी सोडण्याची मागणी जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीने मुख्यमंत्र्यांकडे विभागीय आयुक्तांमार्फत निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या जायकवाडी नांदूरमधमेश्वरमधून हजार ३१० क्युसेक, तर निळवंडेमधून हजार ५३२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नांदूर मधमेश्वरच्या डाव्या उजव्या कालव्यातून ७०० क्युसेक वेगाने पाणी दाखल होत आहे. पाणी वळवल्याने जायकवाडीत कमी वेगाने केवळ हजार ३५० क्युसेक प्रतितास वेगाने पाणी येत आहे. ओझर बंधाऱ्याचा डावा कालावा ७९८ क्युसेकने तर उजवा २०० क्युसेक तर मुळाचा डावा कालवा २०० क्युसेक उजवा कालवा ५०० क्युसेक वेगाने सुरू असल्याने जायकवाडी पाणी कमी वेगाने येत आहे.
निळवंडेचा वेग वाढणार सध्या निळवंडेतून हजार ५३२ क्युसेक वेगाने पाणी येत आहे. बुधवार रोजी पुन्हा निवळवंडेतून पाणी सोडल्याने जायकवाडीच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होईल. असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला.
वरील धरणाची टक्केवारी
नांदूरमधमेश्वर८९.१0, निळवंडे - १०० टक्के, नांदूर मधमेश्वर - ८९.१०, मुळा - ८४.८९, पालखेड - ९४.७१, ओझरखेड - ४५.८६, भंडारदरा - १००, दारणा - ९७.३०, गंगापूर - ९४.४९, करंजवन - ७७.
या धरणातून पाणी सुरू
नागमठाण- हजार ५० क्युसेक, ओझरवेर - हजार ३५० क्युसेक, गंगापूर - ५३६ क्युसेक, दारणा - हजार १७२, भंडारदरा - हजार ३० क्युसेक, पालखेड - ५०० क्युसेक, ओझरखेड - ७५२ क्युसेक