आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध डेअरीजवळ हजारो लिटर पाण्याची गळती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वॉर्ड क्रमांक ५९ -अजबनगर, खोकडपुराअंतर्गत येणाऱ्या शासकीय दूध डेअरीजवळील बस थांबा येथे व्हॉल्व्ह नादुरुस्त असल्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. सकाळी सात वाजेपासून पाणीपुरवठा सुरू होताच नादुरुस्त व्हॉल्व्हमधून भररस्त्यावर पाणी वाहत आहे.

मागील वर्षभरापासून होणाऱ्या पाण्याच्या नासाडीकडे पाणीपुरवठा विभागाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पाणी साचून डेंग्यू आजाराला आमंत्रण दिले जात आहे. एकीकडे पाण्याची टंचाई सुरू असताना दुसरीकडे नादुरुस्त व्‍हॉल्व्हमधून पाण्याची नासाडी होण्याचे िचत्र पाहायला िमळते. अशा प्रकारे होणारी पाण्याची नासाडी तत्काळ
थांबवण्यात यावी, अशी मागणी राजेंद्र साळवे यांनी केली.

मनपा प्रशासनास सांगते
*पाण्याची होणारी नासाडी थांबवण्यासाठी तत्काळ मनपा प्रशासनास सांगण्यात येईल.
सुनीता सोनवणे, नगरसेवक