आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आॅगस्टपर्यंत बसवणार १२ हजार वाॅटर मीटर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील सर्व ग्राहकांच्या नळांना तीन वर्षांत पाण्याचे मीटर लागणार असून पहिल्या टप्प्यात आॅगस्टअखेरपर्यंत १२ हजार मीटर बसवण्यात येणार आहेत. याशिवाय औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटी कंपनी जून-जुलैपासून जायकवाडीपासून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करणार आहे.

समांतर जलवाहिनीसंदर्भात शुक्रवारी औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटी कंपनी मनपाच्या अधिकाऱ्यांची डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बैठक झाली. त्याला मनपा आयुक्त पी. एम. महाजन, शहर अभियंता सखाराम पानझडे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने आगामी काळात कामांचे टप्पे कसे असतील याची माहिती दिली. सरकारी अनुदान असलेली नसलेली अशी दोन्ही प्रकारची कामे एकाच वेळी करावयाची आहेत. सरकारकडून ३०० कोटींच्या अनुदानापैकी १६० कोटींचे अनुदान मिळाले असून त्यातील ७० टक्के कामे झाली तरच उर्वरित अनुदान मिळणार असल्याने या कामांचे विविध टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. ती कामे कोणती याची माहिती कंपनीने दिली.

सध्या पाण्याच्या मीटरवरून शहरात वातावरण तापले आहे. अव्वाच्या सव्वा दराने मीटर देणे ही बाब नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत आहे. याबाबत मनपाने कंपनीला जाब विचारला नसल्याचे सूत्रांनी सांगितले; पण नागरिकांचा संताप पाहाता पर्यायी पावले उचलावी लागतील, असे संकेत या बैठकीत देण्यात आले आहेत.

तीन वर्षांत शंभर टक्के मीटर
सप्टेंबर२०१४ ते ३१ आॅगस्ट २०१५ या कालावधीत १२ हजार मीटर बसवण्यात येणार आहेत. सर्वसाधारणपणे शहरात लाख २० हजार नळ कनेक्शन आहेत. त्यापैकी दहा टक्के नळांना आॅगस्टपर्यंत मीटर बसेल. नंतरच्या वर्षात ४० टक्के नळांना, तर शेवटच्या वर्षात उरलेल्या ५० टक्के नळांना मीटर बसवले जाणार आहेत. तीन वर्षांत शहरातील १०० टक्के नळांना मीटर असणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...