आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water News In Marathi, Wandering For Water Issue At Aurangabad, Divya Marathi

हंडाभर पाण्यासाठी भंटकती..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीबी स्टार - वॉर्ड क्रमांक 62: कोटला कॉलनी अंतर्गत येणार्‍या म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोलपंप या भागातील दोनशे घरांना पाण्यासाठी भटंकती करावी लागत आहे. पाणीपट्टी भरूनही पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
नागरिकांना क्रांती चौक पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा करण्यात येतो. यात काही जणांनी पाणीपट्टी भरली आहे आणि काहींनी भरली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात आला. नळ कनेक्शन असूनही त्यांना खासगी टँकरची मदत घ्यावी लागते. दरम्यान, ऐन उन्हाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्यामुळे नागरिकांनी मनपा अधिकार्‍यांकडे धाव घेतली. परंतु कर भरणा करण्याचे कारण पुढे करण्यात आले. त्यामुळे त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
काय म्हणतात अधिकारी
म्हाडा कॉलनीतील नागरिकांनी पाणीपट्टी कराचा भरणा केलेला नाही. 99 टक्के नागरिकांकडे पाणीपट्टी थकीत आहे. नागरिकांनी पाणीपट्टी कराचा भरणा करावा.
शिवाजी झनझन, प्रशासकीय अधिकारी
काही नागरिकांनी पाणीपट्टी कराचा भरणा केलेला आहे. त्यांना पाणी मिळत नाही. अशा नागरिकांसाठी मनपाकडून टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. इतर नागरिकांना पाणी मिळावे यासाठी प्रयत्‍न करत आहोत.
बबन नरवडे,नगरसेवक
काय म्हणतात नागरिक
येथे पंधरा दिवसांपासून पाणी आले नाही. त्यासाठी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा.
सगुना कवडे, नागरिक
पाण्यासाठी भटकंती करावी लागते. कर भरूनही पाणी मिळत नाही. एका प्रकारे हा अन्यायच आहे.
विवेक वाणी, नागरिक
पाणीपट्टी भरलेली आम्हाला मनपाने पाणीपुरवठा केला पाहिजे. टॅंकरने पाणीपुरवठा करणे योग्य नाही. नळाला सुरळीत पाणीपुरवठा करावा.
सुनील येवला, नागरिक