आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनी फुटली; आज पाणी नाही, शहरातील ६० वसाहतीतील पाणीपुरवठा विस्कळीत होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी गुरुवारी सकाळी फुटली. त्यामुळे शुक्रवारी (१७ एप्रिल) शहरातील किमान ६० वसाहतींना फटका बसणार आहे. तेथील नागरिकांना सोमवारी पाणी मिळेल. दरम्यान, जलवाहिनी फुटण्यापूर्वी वीजपुरवठा खंडित झाल्याने गुरुवारी अनेक भागांत लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली.

सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वीजपुरवठा खंडित झाल्याने १६ एप्रिल रोजी पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याचा दावा केला आहे. जुन्या जायकवाडीत गुरुवारी मध्यरात्री पावणेदोनला मनपाच्या ११ केव्ही, तर महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रामध्ये फ्यूज जळाले. तत्काळ महावितरणच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने पहाटे सहा वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण केले. या काळात जायकवाडीतून पाणी उपसून फारोळ्याकडे पाठवण्याचे काम पूर्ण बंद होते. पंपिंग सुरू करताच ढोरकीन येथे जलवाहिनीला मोठी भेग पडल्याने उपसा बंद करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरूच होते. परिणामी शुक्रवारी पाणीपुरवठा विस्कळीत होईल.

या भागांत येणार नाही पाणी
सिडकोएन-९, एन-११, एन-६, एन-७, एन-९, गुलमंडी, उस्मानपुरा, मुकुंदवाडी, अंबिकानगर, राजनगर, एन-३, एन-४, न्यायनगर, सुराणानगर, अहिंसानगर, एकनाथ कॉलनी, कैलासनगरचा पूर्वेकडील भाग, जिन्सी, बायजीपुरा, फुलेनगर, इटखेडा, कांचनवाडी, स्वप्ननगरी, धावणी मोहल्ला, रामनगर, अयोध्यानगर, देवानगरी, विश्वभारती कॉलनी, जवाहर कॉलनीचा काही भाग, ज्योतीनगर, सहकारनगर, चौसरनगर, एकनाथनगर, पीरबाजार, एसबीएच कॉलनी, भारतनगर, विशालनगर, राणानगर अशा ६० वसाहतीत शुक्रवारी पाणी येणार नाही.

फोटो - ढोरकीन येथे जलवाहिनीला मोठी भेग पडल्याने पाण्याचे फवारे असे उंच उडत होते.