आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाइपलाइन फुटली; काही भागात आज निर्जळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औंरगाबाद - बिडकीन जवळरविवारी सातशे मिमी व्यासाची पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. मनपाकडे दुरुस्तीसाठी साहित्य नसल्याने शहरातील अनेक भागात सोमवारी पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे संकेत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी दुपारी वाजता कवडगाव येथे १४०० व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली होती. चितेगाव येथे अजंता फार्माजवळ ७०० व्यासाच्या जलवाहिनीलाही अशीच गळती लागली होती. मनपाच्या पथकाने युद्धपातळीवर काम करून या दोन्ही ठिकाणच्या गळत्या दुरुस्त केल्या. मात्र काही प्रमाणात शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. दुरुस्तीसाठी सहा मीटर तुकडाच टाकायचा असल्याने पूर्ण पाइपलाइन खाली करावी लागली. त्यातही आवश्यक साहित्य मनपाकडे नसल्याने वाळूज औद्योगिक वसाहतीत शोध घेतला जात आहे. उद्या पार्ट‌्स मिळतील त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू होईल. उद्या सायंकाळपर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, असे चहल यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...