आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपूर्ण चार्‍यांमुळे शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर- नांदूर मधमेश्वर कालव्याचे सोमवारी गंगापूर तालुक्यात दाखल झालेले पाणी धिम्या गतीने शेवटचे टोक असलेल्या अंतापूर येथे मंगळवारी रात्री 9 वाजता पोहोचले. पाण्याची गती कमी असल्याने गंगापूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता असून आवर्तनाचा कालावधी वाढवण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.
नांमकाचे पाणी सोमवारी पहाटे तालुक्यातील प्रवेशद्वार असलेल्या वरखेड येथे पोहोचले होते, तर शेवटचे टोक असलेल्या भेंडाळा व अंतापूर येथे पोहोचण्यासाठी चाळीस तासांचा अवधी लागला आहे. येणार्‍ या पाण्याची उडी वरखेड येथे दोन ते अडीच मीटर असली तरी शेवटचे टोक असलेल्या अंतापूरला अवघे एक ते दीड फूट इतक्या कमी वेगाने पाणी येत आहे. त्यामुळे कितपत पाणी पोहोचेल याविषयी शेतकर्‍यांमध्ये साशंकता आहे.
आवर्तनाचा कालावधी वाढवा
गंगापूर तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती असल्यामुळे नांमकाच्या पाण्यामुळे तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळणार आहे. प्रशासनाने तालुक्यासाठी आवर्तनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन लक्ष्मणराव भुसारे, माजी जि.प. सदस्य अ‍ॅड. नंदकुमार तारू, सुरेश दारुंटे, नगरसेवक विजय पानकडे, प्रतापसिंह परिहार आदींनी केली आहे.
अपूर्ण चार्‍यांमुळे शेतकरी वंचित राहणार
नांदूर मधमेश्वर कालव्यातील लाभक्षेत्रातील 29 गावांमधील अनेक ठिकाणच्या चार्‍ या, पोटचार्‍या या अपूर्णावस्थेत असल्यामुळेदेखील शेतकर्‍यांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. पुढील आवर्तन येण्यापूर्वी नांमका प्रशासनाने त्या पूर्ण करण्यासाठी तातडीचा निधी उपलब्ध करून देण्याची शेतकर्‍यांची मागणी आहे. असे असले तरी गंगापूर तालुक्यात या वर्षी जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या प्रमाणात अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे लाभक्षेत्रातील पाझर तलाव कोरडेठाक असून विहिरींनीदेखील तळ गाठलेला असल्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी किमान दहा दिवस पाण्याचे आवर्तन आवश्यक आहे. गंगापूर तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या भेंडाळा, अंतापूर, बोलेगाव परिसरातील दोन हजार एक रांवरील लाभार्थी शेतकर्‍ यांनी पाण्याची मागणी नोंदवली आहे. वरच्या भागातील शेतकर्‍यांनी टेलपर्यंत पाणी येण्यासाठी समजूतदारीची भूमिका घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन सभापती कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केले आहे.

गंगापूर तालुक्याची गरज व मागणी लक्षात घेता आवर्तनाचा कालावधी वाढवण्यासाठी व टेलला पाणी पोहोचल्यानंतर आवर्तनाचे दिवस मोजण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.
जे. एस. मेहेर, उपविभागीय अधिकारी, नांमका