आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीबाणीतही ‌औरंगाबादच्या उद्योजकांनी मानली नाही हार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अभूतपूर्व पाणीटंचाईमुळे औरंगाबादच्या उद्योगांची सरकारने पाणी कपात केली असली तरीही तीन हजार उद्योगांनी या आणीबाणीत कच खाता पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करत औद्योगिक स्पर्धेत तग धरली. अभियांत्रिकी कंपन्यांनी पाण्याची मोठी बचत करीत उत्पादन केले. मात्र औषधी मद्य कंपन्यांना आपले उत्पादन ४० टक्क्यांनी घटवावे लागले. मान्सून चांगला बरसेपर्यंत वाळूज येथील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त उद्योगांनी ३० जूनपर्यंत तिसरी शिफ्ट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मार्चपासूनच यंदा जायकवाडी धरणातील पाणी शून्य टक्क्यांवर पोहोचल्याने मृतसाठ्यातूनच शहराला पाणीपुरवठा सुरू झाला. एप्रिलमध्ये खंडपीठाच्या आदेशाने बिअर उद्योगांचे ६० टक्के तर उर्वरित उद्योगांचे २५ टक्के पाणी कपात झाले. मे महिन्यात जायकवाडी धरणात चर खोदून एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुरू ठेवला.

गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून हे अधिकारी दररोज धरणावरील पाण्याचा हिशेब ठेवत आहेत. अडीच महिन्यांपासून औरंगाबादचे उद्योजक पाणीबाणी सहन करीत आहेत. बजाज ऑटोसह अनेक मोठ्या उद्योजकांनी पाण्याची बचत करणारे अनेक कार्यक्रम राबवले. बजाजने चारचाकी तीनचाकीचे उत्पादन एक दिवस बंद ठेवून कामगारांना पगारी रजा दिली. तसेच वाळूजसह शेंद्रा, एमआयडीसी पैठण, चिकलठाणा रेल्वेस्टेशन भागातील उद्योजकांनी काटकसरीने पाणी वापरून उद्योग चालवले. पाणीबचतीसाठी उद्योगांनी राबवलेल्या या उपक्रमांचे स्वागत होत आहे.

उत्पादन शुल्कात चाळीस टक्क्यांनी घट
औषधीसह दारू कंपन्यांना पाणीबाणीचा मोठा फटका बसला आहे. या कंपन्यांना राज्य उत्पादन शुल्कात ४० टक्क्यांनी फटका बसला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनेक उद्योजकांना विदेशातील ऑर्डर होत्या. त्यांनी पाणीबाणीतही धीर खचू देता विदेशी ऑर्डर पूर्ण केल्या.

सत्त्वपरीक्षा
औरंगाबादच्या उद्योग क्षेत्राने जगाला चांगला संदेश दिला आहे. ही सत्त्वपरीक्षा आहे. पाणीबाणीत अत्यंत संयमाने उत्पादन केले. आता मात्र पाऊस लवकर पडला पाहिजे. नाही तर औरंगाबादच्या घसरलेल्या उद्योगाच्या महसुलावर अजून विपरीत परिणाम होईल. -प्रसाद कोकीळ, सचिव,सीएमआयए

४० लाख लिटर पाण्याची बचत
केरळात मान्सून धडकल्याने उद्योजकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अशी पाणीटंचाई पुन्हा येऊ नये यासाठी वाळूज भागातील उद्योजकांनी जलसंधारणाची अनेक कामे केली आहेत. तीन महिन्यांत चाळीस लाख लिटर पाण्याची बचत केल्याचा दावा उद्योजकांनी केला आहे. पाऊस पडेपर्यंत वाळूजच्या काही उद्योजकांनी तिसरी शिफ्ट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बातम्या आणखी आहेत...