आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजिंठा परिसरातील लोकांना काळ्या पाण्याची शिक्षा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा: उन्हाची तीव्रता वाढल्याने अजिंठा धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. त्यात धरणातील फिल्टरचे काम रखडल्याने अजिंठावासीयांना दूषित पाण्यावर तहान भागावी लागते. दुसरीकडे भारत निर्माण योजनेचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांच्या संकटात आणखी भर पडली आहे.
अजिंठा-अंधारी मध्यम प्रकल्पातून अजिंठा गावाला पाणी पुरवठा केला जातो. सध्या धरणातील पाणीपातळी कमालीची खालावली आहे. मृत साठय़ावर अजिंठावासीयांची तहान भागवली जात आहे. धरणातील फिल्टर काम अर्धवट असल्याने नागरिकांना गाळयुक्त पाणी मिळते. या पाण्यातून आजाराची लागण होण्याची भीती आहे. या संकटात भर म्हणजे अजिंठा येथे भारत निर्माण योजने अंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यासाठी 2 करोड 35 लाख रुपये मंजूर झाले होते. त्यातून 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. 10 टक्केच काम बाकी आहे. हे काम एका वर्षात पूर्ण होणार होते; परंतु त्याला तीन वर्षे झाली तरी ते पूर्ण झाले नाही.
-या कामासाठी आमचा सतत सिल्लोड, औरंगाबाद कार्यालयात चकरा सुरू असून, लवकर फिल्टरचे काम पूर्ण करून घेणार. दिलीप झलवार , उपसरपंच, अजिंठा