आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड महनि्यापासून ५० हजार नागरिकांना पाण्याची टंचाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेचापाणीपुरवठा समांतर योजनेकडे हस्तांतरित झाल्यापासून पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. मागील दीड महनि्यापासून पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्यामुळे एन-२, एन-३ आणि एन-४ भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावरून संतप्त नगरसेवक प्रमोद राठोड, माजी नगरसेवक दामूअण्णा शिंदे (नगरसेविका सत्यभामा शिंदे यांचे पती) यांनी एन-५ येथील जलकुंभावर धाव घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

शहरातील पाणीपुरवठा औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी प्रा. कंपनीकडे हस्तांतरित झाला; परंतु पाण्याचे नियोजन व्यवस्थित केल्यामुळे गुंठेवारी भागासह अधिकृत भागातही पाणीटंचाई निर्माण झाली. कमी दाबाने, तर कधी निर्जळीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. एवढेच नव्हे, तर टँकरचे पैसे भरूनही पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांना विकत पाणी आणावे लागत आहे. मागील दीड महनि्यापासून एन-२ ठाकरेनगर भागासह जयभवानीनगर, अंबिकानगर, रामनगर, चिकलठाण्यात पाणीपुरवठ्याचे नियोजन नाही. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.

^वॉर्डात पाणीआल्यामुळे आम्हाला स्वत:ला टाकीवर यावे लागते. पाण्याचे नियोजन करावे लागते. कोणी अधिकारी हजर राहत नाही. यापुढे तीव्र आंदोलन छेडू. दामूअण्णाशिंदे, माजीनगरसेवक.
थोडा वेळ लागणार
पाण्याचेनियंत्रण करण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. पंप मशीन सगळे चालू आहेत. कोणतेही पंप बंद ठेवत नाही. ज्या भागात पाणी येत नाही, त्या भागात काम चालू करण्यात आलेले आहे. -जी. एस. बासू, औरंगाबादवॉटर युटिलिटी प्रा. कंपनीचे अधिकारी.

कर्मचारी गैरहजर
वॉर्डक्रमांक ७२ एन-३, एन-४ भागात सकाळी सहा वाजता सोडण्यात येणारे पाणी आल्यामुळे नागरिकांनी नगरसेवक राठोड यांना फोन केले. असाच प्रकार एन-२ ठाकरेनगर भागात होत असल्यामुळे राठोड शिंदे यांनी एन-५ येथील जलकुंभावर धाव घेतली. या वेळी जलकुंभावर कोणतेही कर्मचारी उपस्थित नव्हते. आजी-माजी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या वेळी राजेश कोल्हे, महेश फड, रामदास गायकवाड, शरद कदम, सुमीत गायकवाड, सचनि नवपुते आदींचा समावेश होता.