आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Water Problem At Undengaon, Auragabad, Save Water

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हंडाभर पाण्यात पाच मुलांची आंघोळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उंडणगाव: सध्याउन्हाळयाच्या शेवटच्या टप्प्यात उंडणगाव परिसरात पिण्याच्या पाण्यासह वापराचे पाणी मिळणे दुर्मिळ झाले आहे. महिला पिण्याच्या पाण्यासह वापराच्या हंडाभर पाण्यात पाच मुलांना आंघोळ घालण्याची वेळ आली आहे. परिसरातील मोहाळ, खुल्लोड, विरगाव या गावातील ग्रामस्थ पाण्याचे दुर्भिक्ष झाल्यामुळे त्रस्त झाले आहेत.
अजिंठय़ातील महिलांना पाण्यासाठी उन्हाचा पार चढलेला असतानादेखील याची तमा न बाळगता दूरवर जाऊन पाणी भरून आणावे लागत आहे. स्वत:च्या कुटुंबासाठी लागणार्‍या पाण्यासाठी दिवस रात्र झगडताना येथील महिला हे नित्याचेच चित्र झाले आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच आंघोळ व सांडपाण्याची सारखीच अवस्था झाली आहे. यामुळे परिसरातील महिलांना 5 मुलांना केवळ एका हंड्यात आंघोळ घालण्याची वेळ आली आहे. यावर प्रशासनाने लवकर उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.