आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी वाढीव पाणीपट्टी; तीन वर्षांनंतर पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एकसप्टेंबरपासून पाणीपुरवठा ‘समांतर’च्या कंत्राटदारांकडे वर्ग करण्यात येणार आहे. तीन वर्षांनंतर नागरिकांना ‘समांतर’चे पाणी मिळण्यास सुरुवात होईल. मात्र, वाढीव पाणीपट्टीचे बिल पुढील महनि्यापासून (सप्टेंबर) दिले जाणार आहे. नागरिकांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे. खासदार चंद्रकांत खैरे आणि मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी मात्र या धोरणाचे समर्थन केले असून त्याशिवाय समांतरचे कामच पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

समांतर योजनेच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली असली, तरीही िवधानसभेची आचारसंिहता लागण्यापूर्वी िशवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येईल. ‘समांतर’ची माहिती देण्यासाठी खासदार खैरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी ७९२ कोटी खर्चाची समांतर, तर कार्यकारी अभियंता अफसर सदि्दिकी यांनी ३६५ कोटींच्या भूमिगत गटार योजनेची माहिती देणारे पाॅवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केले. समांतरच्या कंत्राटदारांनी खूप कमी नफ्यात ही योजना पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले असून ७९२ कोटींचा प्रस्तावित खर्च जुन्या दरानुसार आहे. संपूर्ण योजनेच्या पूर्णतेला २० वर्षे लागणार असून त्यापैकी महत्त्वाचे काम आगामी तीन वर्षांतच पूर्ण केले जाणार आहे.
तरीही निविदेच्या दरात एक रुपयाही वाढ दिली जाणार नाही. त्यामुळे कंत्राटदार कमी नफ्यातच काम करणार असल्याने वाढीव पाणीपट्टी लगेच द्यावी लागणार असल्याचे पानझडे, खैरे यांनी म्हटले.

गळती शोधणे, अतिरिक्त नळ कनेक्शन शोधणे, मीटर बसवणे आदी कामे तीन वर्षांतच पूर्ण केली जातील. नळावर मीटर बसवण्याचे काम सप्टेंबर २०१५ पासून सुरू होईल. २३ ऑगस्टपर्यंत आचारसंहिता लागली नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाईल, असे खैरे यांनी म्हटले. या वेळी महापौर कला ओझा, आमदार प्रदीप जैस्वाल, स्थायी समितीचे सभापती िवजय वाघचौरे, सभागृह नेता किशोर नागरे, िजल्हाप्रमुख अंबादास दानवे, गजानन बारवाल, राजू वैद्य, नंदकुमार घोडेले, काशीनाथ कोकाटे, मीर हदिायत अली, सुनीता आउलवार, ऋषिकेश खैरे यांची उपस्थिती होती.भारतीय जनता महिला मोर्चाच्या नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्षा िवजया रहाटकर यांचा खैरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.