आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे ‘लातूर’ करूनच थांबणार का? बीड बायपास-सातारा-देवळाई भीषण टंचाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लातुरात आज जी स्थिती आहे ती काही एका दिवसात झालेली नाही. एकतर पाण्याची व्यवस्था केली नाही. जी होती त्यातही काळजी घेतली नाही. त्यातच वरुणराजा रुसला. आज रेल्वेने येथे पाणी आणावे लागत आहे. यापूर्वी कधीही अशी वेळ आली नव्हती. हजारो लोक शहर सोडून जात आहेत. काळजी घेतली नाही तर आपल्या औरंगाबाद शहरातही तशीच परिस्थिती येऊ शकते. कारण आज प्रत्येक वसाहतीमध्ये अक्षम्य नासाडी होत आहे.
नासाडी करताना जरा हे चित्र आठवा...उद्या तुम्हीही या जागी असू शकता
सातारा-देवळाईपरिसरात तर बोअर अन् विहिरी केव्हाच कोरड्या पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची मदार तर केवळ गावालगत असणाऱ्या महादेव मंदिराच्या आवारातील एकाच कूपनिलकेवर आहे. त्यामुळे तेथेच संपूर्ण गावाची झुंबड उडते, तर काही वसाहतीतील महिलांना बीड बायपास रस्ता ओलांडून घोटभर पाण्यासाठी गल्लोगल्ली हिंडावे लागते. पण या स्थितीतही काही महाभाग मात्र बिनधास्तपणे पाण्याची नासाडी करताना दिसतात.
जलकुंभावर ही बोंब
शहरातील सिडको एन-७, एन-५, शिवाजीनगर तसेच क्रांती चौकातील जलकंुभातून टॅकरमध्ये पाणी आेतणाऱ्या जलवाहिन्या फुटल्या आहेत. त्यामुळेही पाण्याची नासाडी होत आहे. ही परिस्थिती सर्वच जलकुंभांवर असल्याचे कर्मचाऱ्यांनीच सांगितले.

येथे ही होते नासाडी
रामनगर,विठ्ठलनगर, मुकुंदवाडी, संतोषीमातानगर, अंबिकानगर आणि हडको एन-११ परिसरातील स्वामी विवेकानंदनगर, पवननगर, शिवाजीनगर, नवजीवन कॉलनी, सिडको एन-६ परिसरातील संभाजी कॉलनी, मथुरानगर, आविष्कार कॉलनी, शिवज्योती हाउसिंग सोसायटी, शहानूरवाडी, उस्मानपुरा, बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, उच्च न्यायालय ते कामगार चौक मार्ग, जयभवानीनगर रोड, टीव्ही सेंटर चौक, जवाहर कॉलनी ते अाकाशवाणी रोड, त्रिमूर्ती चौक.
शिवाजीनगरात टिपलेले हे छायाचित्र. एकीकडे पाण्यासाठी भटकंती होते, तर दुसरीकडे अशी नासाडी होते.

अयोध्या नगरात पाणी ज्या दिवशी येते त्या दिवशी गल्लीतून असे पाणी वाया जाते.
बायजीपुरा भागातपाण्याची नासाडी होत अाहे. रस्त्यावरून पाणी वाहत जात असताना नागरिकांना त्याचे महत्त्व वाटत नाही. संपूर्ण पाणी महानगरपालिकेच्या शाळेच्या मुख्य रस्त्यापर्यंत वाहत चालले अाहे. किरणजाईबहार, नागरिक

अशी होतेय पाण्याची भयंकर नासाडी
नळाच्या पाण्याने काही जण गाड्या धूत आहेत, तर काही ठिकाणी नळाला मोटारी लावून धो-धो पाणी गल्लीतून सोडले जात आहे. सरकारी नळाला तोटी नसल्यामुळे पाणी वाहते, तर दुसरीकडे पाणी भरल्यानंतरही नागरिक रस्त्यावर पाणी वाहत जाईपर्यंत मोटारी चालू ठेवतात. घरावर बसवण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यासुद्धा भरून वाहतात. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

एकनाथनगरात मोटारींमुळे गाळ
या भागात मोटारी लावल्यामुळे संपूर्ण पाइपलाइनमधील गाळ ओढला जातो. यातून मोटारीसुद्धा खराब होऊन नागरिकांना पाणी मिळत नाही. दरम्यान, पाण्याची बचत करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करायला पाहिजेत.

संजयनगर : तोटी नसलेला नळ
संजयनगर भागातील गल्ली क्रमांक १६ मध्ये सरकारी नळाला तोटी नाही. त्यामुळे पाणी आल्यावर ती सताड उघडी ठेवली जाते. काही लोक पाणी भरतात. एरवी ती सुरूच असते. त्यामुळे थेट कैलास स्मशानभूमीच्या पुलापर्यंत लाखो लिटर पाणी वाहून जाते.

श्रीकृष्णनगर : ओटे धुण्याची पद्धतॉ
हडको श्रीकृष्णनगरातील एप्रिल रोजी पाणी भरून झाल्यावर अनेकांनी असे ओटे धुऊन घेतले. असा प्रकार नेहमीच होतो. संपूर्ण गल्लीतून धो-धो ओढा वाहिल्यासारखे पाणी वाया घालवले जाते.

मनपाच्या अधिकाऱ्यांसोबतआमचे कर्मचारी वॉर्डात फिरत आहेत. ज्या ठिकाणी नागरिक पाण्याचा अपव्यय करतील त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. राहुलमोतियेळे, जनसंपर्कअधिकारी, समांतर

मागील आठवर्षांपासून लाखो लिटर पाणी वाया चालले आहे. काही भागात बांधकाम करताना झरे लागतात. काळजी घेऊन फिल्टर करून वापरले जावे. पूर्वी ठीक होते, पण आता ही नासाडी परवडणारी नाही. बाळूनलावडे, नागरिक

या भागात होते सर्वाधिक नासाडी
मुकुंदवाडी,चिकलठाणा, जयभवानीनगर, न्यायनगर, पुंडलिकनगर, गजानन कॉलनी, हनुमाननगर, म्हाडा कॉलनी, एन-१२ डी सेक्टर, सुदर्शननगर, एन-११, सी, के, सेक्टर, अयोध्यानगर, मयूर पार्क, सुरेवाडी, बायजीपुरा या भागात सर्वाधिक पाण्याची नासाडी होत असल्याचे दिसून आले.

बायजीपुरा गल्लीतून पाणी सोडले जाते
तीनदिवसांआड पाणी येते. गल्ली क्रमांक ते ३४ या भागात एप्रिल रोजी सकाळी पाणी आले होते. त्या वेळी गल्ल्यागल्ल्यांतून बिनधास्त पाणी सोडले गेले.
कित्येक वर्षांपासून अशीच नासाडी होते, पण आता ती परवडणारी नाही
सलग अवर्षणाच्या तडाख्यामुळे भीषण दुर्भिक्ष...तरीही बेफाम नासाडी. शहरभरात ही स्थिती दिसते. गाड्यांची वॉशिंग, सताड उघडे नळ...तर दुसरीकडे हंडाभर पाण्यासाठी भटकंती. नासाडी अशीच सुरू राहिली तर पाण्यावाचून तडफडणाऱ्या लातूरसारखी स्थिती होईल. त्यामुळे औरंगाबादचे लातूर करूनच आपण थांबणार आहोत का, असा प्रश्न उपस्थित होतो.