आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजिंठा लेणी पर्यटकांसाठी जुन्या हौदातून पाणीपुरवठा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा: ‘अजिंठा लेणीतील पाण्याची टाकी फुटल्याने पर्यटक हैराण’ या मथळ्याखाली दै. दिव्य मराठीत 4 रोजी सचित्र वृत्त प्रकाशित होताच मंगळवारी भारतीय पुरातत्त्व विभागाने त्यांच्या राखीव हौदातून पर्यटकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. दुसरीकडे मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकार्‍यांनी अद्याप पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून दिल्या नाहीत.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील लेणी क्रमांक 4 , 8, 16 समोर पाण्याच्या 4 सिन्टेक्स टाक्या आहेत. यातील दोन टाक्यांचे पाणी एमटीडीसीला जाते, तर उरलेल्या दोन टाक्यांचे पाणी पर्यटकांसाठी ठेवण्यात आले आहे. यातील एक टाकी तीन वर्षांपूर्वीच फुटलेली आहे. उर्वरित एक टाकी तीव्र उन्हामुळे 1 जून रोजी फुटली. पाणीपुरवठा करणारी एकमेव टाकी फु टल्याने लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची पाण्याअभावी प्रचंड गैरसोय झाली. अनेक पर्यटक अर्धवट लेणी पाहून परत गेले.
याबाबत दिव्य मराठीने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच पुरातत्त्व विभागाने दखल घेत आपत्कालीन राखीव हौदातून आज पर्यटकांना मोटारी लावून पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय टळली.
अजिंठा लेणीत पर्यटकांसाठी याच जुन्या टाकीतून पाण्याची सोय केली.
>आज सकाळी आम्हाला प्राधिकरण विभागाचा फोन आला होता. आम्ही पाण्याची व्यवस्था करतो म्हणून सायंकाळपर्यंत ते आले नव्हते. मात्र, तत्पूर्वी आम्ही स्वत:च्या जुन्या हौदातून पर्यटकांसाठी पाणी उपलब्ध करून दिले. डी. एस. दानवे, व्यवस्थापक, भारतीय पुरातत्त्व विभाग.
अजिंठा लेणीतील पाण्याची टाकी फुटल्याने पर्यटक हैराण
अजिंठा परिसरातील लोकांना काळ्या पाण्याची शिक्षा!
अजिंठा, वेरूळ लेणीत मोबाइल, कॅमेरा बंदीचे संकेत