आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Problems Issue At Aurangabad, Divya Marathi

इकडे पाण्‍याचे संकट, तिकडे यत्रणांचे भांडण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रणरणत्या उन्हात पाण्याविना शहरवासीयांचे घसे कोरडे होत असताना वीजपुरवठा करणारे अधिकारी मनपावर तर महापालिकेचे अधिकारी महावितरणच्या अधिकार्‍यांवर तोंडसुख घेऊ लागले आहेत. गेल्या आठवड्यात चार वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने औरंगाबादकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागला. या समस्येवर उपाय शोधण्याचे सोडून दोन्हीही जबाबदार यंत्रणा भांडणाच्या मूडमध्ये दिसत आहेत.

फीडरच्या देखभालीअभावी आणि मान्सूनपूर्व दुरुस्ती न झाल्याने जायकवाडीतील पंपहाऊसचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. गेल्या आठवड्यात चार वेळा अर्धा ते साडेतीन तास वीज खंडित झाल्याने औरंगाबादचे पाणी तोडल्यासारखीच अवस्था झाली होती. याविषयी मनपाने पत्र लिहूनही फायदा झाला नाही, तर वीज मंडळाचे अधिकारी आमच्याकडून काही अडचण नसून तिकडे औरंगाबादचाच प्रश्न असू शकतो, असे सांगत आपली जबाबदारी झटकत आहेत. परिणामी धरणात पाणी असून औरंगाबादकरांना भर उन्हाळ्यात तहानलेले राहावे लागत आहे.

औरंगाबादचा सगळा पाणीपुरवठा जायकवाडीवर अवलंबून आहे. शहरासाठी लागणारे 125 एमएलडी पाणी जायकवाडीतील आठ पंप 24 तास उपसा करून पाठवत असतात. त्यासाठी मनपा जवळपास तीन कोटी रुपये महिन्याला मोजते. पाणी ही अत्यावश्यक सेवा असल्याने या उपशासाठी स्वतंत्र फीडर देण्यात आले आहे. पाण्याच्या फीडरला 24 तास अखंड वीजपुरवठा करणे आवश्यक आहे. पण जायकवाडीच्या बाबतीत मागील 10 दिवसांपासून सगळेच गणित बिघडले आहे.

मनपा म्हणते चार वेळा वीज खंडित : शहराची पाण्याची वाढलेली गरज पाहता पूर्ण क्षमतेने 24 तास पाणी उपसा करावा लागत असताना वीज पुरवठा खंडित होणे गंभीर आहे. जायकवाडी ते फारोळा ते औरंगाबाद असा मोठा पल्ला असल्याने वीज पुरवठय़ात अध्र्या तासाचा जरी खंड पडला तरी शहरातील टाक्या भरण्याचे व नंतर पाणी सोडण्याचे गणित कोलमडते. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यू. जी. शिरसाट यांनी सांगितले की, मागील आठवड्यात चार वेळा वीज खंडित होण्याचे प्रकार घडले.