आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Problems Issue At Mayors Ward, Divya Marathi

महापौरांच्या वॉर्डात पाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वॉर्ड क्रमांक 70, विद्यानगरअंतर्गत येणार्‍या गजानन कॉलनी भागातील काही भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा अनियमित होत आहे. पाणी येण्याची वेळ निश्चित नसल्याने तीनशे-चारशे घरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
शहराच्या पहिल्या नागरिक म्हणून ओळख असणार्‍या महापौर कला ओझा यांच्या वॉर्डात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. कमी दाब आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. काही घरांना बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे. रात्रीच्या वेळी सोडण्यात आलेला पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. यामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. यावरून नागरिक आणि पाणीपुरवठा कर्मचार्‍यांचा वादही होत आहे. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात मनपा अधिकार्‍यांना संपर्क साधला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे नागरिक म्हणणे आहे. मनपाने लक्ष घालून त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.