आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकबाकी १२१ कोटींची , कर चुकवणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अार्थिक अडचणींमुळे दिवसेंदिवस मनपाची अवस्था बिकट होत चालली असताना तीन ते पाच वर्षांत ६० हजार नागरिकांनी १२१ कोटींची पाणीपट्टी थकवल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मनपाच्या अधिकाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवले असले, तरी सन्मान योजना सुरू करत समांतरने वसुलीसाठी पुढाकार घेतला आहे. ३१ जानेवारीपर्यंत ही योजना सुरू राहणार असून आतापर्यंत फक्त १०० नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
कर भरणा करण्याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे मनपाकडे येणाऱ्या कराची रक्कम दिवसेंदिवस कमी होत आहे; कर वसुलीच्या रकमेत घट होत असली तरीही किती नागरिकांकडे करापोटी किती रक्कम थकली आहे, याची आकडेवारी काढण्यात आलेली नाही. पाणीपट्टी वसूल करण्याचे अधिकार समांतर कंपनीकडे आल्यानंतर थकबाकी वसून करण्यास प्राधान्य दिले जात अहो. कंपनीने तीन ते पाच वर्षे जुन्या थकबाकीदारांची यादी बनवली असून यात ६० हजार ग्राहक आणि लहान- मोठ्या संस्था सापडल्या आहेत. यांच्याकडे १२१ कोटी रुपयांची थकबाकी असून वसुलीसाठी समांतरने प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, ३१ जानेवारी रोजी सन्मान योजनेची मुदत संपणार असून यानंतर थकबाकीदारांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे समांतर कंपनीचे अविक बिस्वास, राहुल मोतियले यांनी सांगितले. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, कारवाई टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

३१ जानेवारीपर्यंत मुदत
थकबाकीची रक्कम भरणे शक्य नसणाऱ्यांसाठी सुलभ हप्त्याने रक्कम भरण्याची मुभा देणारी सन्मान योजना राबवण्यात येत आहे. ३१ जानेवारीपर्यंत थकबाकीच्या ३५ टक्के रक्कम भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार शंभर नागरिकांनी रक्कम जमा केली आहे. योजनेचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असून रविवारीही ग्राहक सेवा केंद्र सुरू राहणार आहेत.

पाणीपट्टीच्या वसुलीसाठी "समांतर'चा पुढाकार
२१हजार ग्राहकांनी ३१ मार्चपर्यंतचे बिल भरले.
हजारपेक्षा जास्त ग्राहकांनी द्वैमासिक बिल (नोव्हेंबरपर्यंत) भरले.
६० हजार थकबाकीदारांकडे १२१ कोटी रुपये बाकी आहेत.
हजार ग्राहक तीन वर्षांपूर्वीचे असून त्यांच्याकडे पाच कोटी रुपये थकले आहेत.
२० हजार ग्राहक तीन ते पाच वर्षांपूर्वीचे त्यांच्याकडे २४ कोटींची बाकी आहे.
वर्षापेक्षा जुने ३२ हजार ग्राहक असून त्यांच्याकडे ९२ कोटी थकीत आहेत.