आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता: उपसा घटला! पाणी संकट गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जायकवाडीतून शहराला लागणाऱ्या पाण्याचा उपसा कमी झाल्याने रोज १५ ते २० एमएलडीची तूट सुरू झाली असून शहरासमोर पाणी संकट उभे राहण्याची भीती निर्माण झाली आहे. येणारा महिना हा औरंगाबादकरांसाठी सत्त्वपरीक्षेचा ठरणार असून पाण्याची वाढती मागणी घटता पुरवठा यामुळे पाण्याच्या वेळेत किमान दहा मिनिटे कपात केली जाण्याची शक्यता आहे.

मे महिना निम्मा संपत आला आहे. उन्हाळा चांगलाच भरात आला आहे. पाण्यासाठी जायकवाडीवर अवलंबून असणाऱ्या औरंगाबादवर यंदा पुन्हा एकदा पाणी संकट घोंगावू लागले आहे. पुढचा दीड महिना शहरासाठी सत्त्वपरीक्षेचा ठरणार असून पाणीपुरवठा करणारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी मनपा यांचे पाणी या काळात जोखले जाणार आहे. मागणीच्या प्रमाणात पाण्याचा उपसा नसल्याने ही स्थिती निर्माण झाली असून जायकवाडीचा पाणीसाठाही झपाट्याने कमी होत चालला आहे. त्याचा परिणाम येत्या काळात पाहायला मिळणार आहे.
जूनमध्ये पाणीपातळी तळाला जाणार
कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे म्हणाले की, जायकवाडी जलाशयात सध्या 8% पाणीसाठा आहे. पण उरलेला उन्हाळा नंतरचा बेभरवशाचा पावसाळा पाहता जून महिन्यात औरंगाबादला मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. पावसाळा जूनमध्ये सुरू झाला आणि समाधानकारक पाऊस झाला तरी धरणात पाणी यायला किमान जुलै उजाडणार आहे. कारण वरची ११ धरणे भरल्याशिवाय पाणी सोडले जाणार नाही. त्यामुळे जायकवाडी धरणात जुलैत पाणी आल्यावरच शहराचा ताण कमी होऊ शकतो.
उपसा कशामुळे घटला?
जायकवाडीतून शहरासाठी आठ पंप पाणी उपसतात. त्यांच्या माध्यमातून रोज १४० ते १५० एमएलडी पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. पण पाण्याची पातळी खालावल्याने आजघडीला रोज ११५ एमएलडी पाण्याचाच उपसा होत आहे. १५ ते २० एमएलडी पाण्याची रोज तूट होत आहे. उपसा करणाऱ्या पंपांना आवश्यक असलेले प्रेशर घटत्या पाण्यामुळे मिळत नसल्याने यापेक्षा अधिक पाणी उपसले जात नाही.
पुढील स्लाइडसवर क्लिक करून वाचा, पाण्याच्या वेळेत कपात केली जाणार..
बातम्या आणखी आहेत...