आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Resources Availability Decrease Day By Day

औरंगाबादेत जलसाठे आटले; पाण्यामुळे लग्ने बाहेरगावी,शेतकर्‍यांची दैना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जायकवाडीच्या पाण्यावर तगून असलेल्या औरंगाबादच्या उंबरठ्यावर दुष्काळ येऊन ठेपला आहे. लगतची गावे, वस्त्यांवर परिस्थिती बिकट होत आहे. पाण्याचे हाल पाहून विवाहही बाहेरगावी जात आहेत. शेती उद्ध्वस्त झाली असून बागायतदार आणि कोरडवाहू शेतक-याची पुरती दैना होत आहे. कसेबसे पिण्यासाठी पाणी मिळवणे, त्यातूनच जनावरांचीही सोय करणे यातच खेड्यापाड्यांतील लोक हैराण आहेत.
बीड, जालना, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यांत विदारक दुष्काळ आहे. करमाड, गोलटगाव, लोहगड नांद्रा, जातेगाव, बाभूळगाव, अंजनडोह गावांत पाण्यासाठी परवडच दिसते. जातेगाव प्रकल्पात ओंजळभर पाणीही दूषित आहे. करमाड तर पाणी असून तहानलेले आहे.