आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: जलयुक्तची कामे पूर्ण न केल्यास अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत यावर्षी २०१६-१७ मध्ये २२३ गावांमध्ये विविध प्रकारची कामे सुरू आहेत. येत्या १५ जूनपर्यंत सर्व कामे पूर्ण केली पाहिजेत. जे अधिकारी, कर्मचारी कामे पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावरच कार्यमुक्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी गुरुवारी जलयुक्त शिवारच्या आढावा बैठकीत दिला. जिल्ह्यात जलयुक्त शिवार कामांचे नियोजनही चुकले आहे, अशी कबुलीही त्यांनी दिली.
 
गुरुवारी जलयुक्त शिवार जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेत राम यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. जिल्हाधिकारी म्हणाले की, जलयुक्त शिवार कामांचे नियोजन चुकले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कामाला गती दिलीच पाहिजे.
 
या अभियानात क्षेत्रोपचार कामावर अधिक भर दिला पाहिजे. वहिती क्षेत्र आणि पडीक क्षेत्र असे दोन भाग करून कामाचे नियोजन करावे. यामध्ये साधारणत: खोल समतल चर आणि कंपार्टमेंट बंडिंग ही कामे जास्त प्रमाणात घ्यावीत. त्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध होऊ शकतो. तसेच सीएसआर फंडही मिळू शकतो. कोणत्या गावात किती कामे सुरू आहेत याची पाहणी काही गावांना प्रत्यक्ष भेट देऊन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
चुकीच्या वेळी जॉईन झालो : जिल्हाधिकारी म्हणाले की, मी चुकीच्या वेळी जॉईन झालो. पावसाळा सुरू व्हायला अवघा दीड महिना बाकी असला तरी या वर्षी निवडलेली २२३ गावांची कामे १५ जूनपूर्वी झालीच पाहिजेत. सिमेंट नाला बांधदेखील चांगला क्षेत्रीय उपचार आहे. लोकसहभागातून कामे केल्यास पोकलेन मशीनसाठी इंधन उपलब्ध करून देऊ. 
 
जिल्ह्यात आता कामांना गती येणार 
मुख्यमंत्री सर्वच जिल्ह्यांत कामांची पाहणी करणार आहेत. त्यामुळे सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर काम वेळेत पूर्ण करण्याचा ताण आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी निधी पांडे असताना मराठवाड्यात जिल्हा सर्वात पिछाडीवर होता. त्याबाबत चर्चाही सातत्याने सुरू होती. मात्र नवलकिशोर राम यांनी बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवारची चांगली कामे केल्याने यावर्षी जिल्ह्यात कामाला गती येईल अशी अपेक्षा आहे. 
बातम्या आणखी आहेत...