आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निम्मा जिल्हा केवळ टँकरच्या पाण्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यातील 1378 गावांपैकी तब्बल 518 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून याची सरासरी 50 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. औरंगाबाद शहराचा काही भागही टँकरवरच अवलंबून राहत असल्याने किमान 17 लाखांपेक्षाही जास्त नागरिक टँकरवरच आपली तहान भागवत असल्याचे स्पष्ट होत आहे.

ऑक्टोबर महिन्यापासूनच जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली होती. प्रारंभीपासूनच टँकरची संख्या वाढत होती. मात्र एप्रिल महिन्यात टँकरच्या संख्येने पाचशेचा आकडा पार केला आणि मे महिन्यात तर हा आकडा साडेसहाशेच्याही पुढे गेला आहे. येत्या काळात पाण्याचे स्रोत कमी होत असल्याने टँकरची संख्या वाढण्याबरोबरच पाणी वाहून आणण्याचे अंतरही वाढणार हे नक्की आहे. त्याचबरोबर शहरातील काही भागांतही टँकर वाढवावे लागणार आहेत. त्यामुळे जोरदार पाऊस होऊन नदी-नाले भरून वाहत नाहीत तोपर्यंत निम्मी जनता टँकरवरच आपली तहान भागवणार आहे.