औरंगाबाद - मे महिना सुरू होताच जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहेत. सध्या लाख ४७ हजार लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ४३८ टँकरने ३२३ गावे आणि १५ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १६ पैकी मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. विशेष म्हणजे गोदाकाठच्या गावांना पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसत आहे.
मराठवाड्यात यंदा दर आठवड्याला पाणीटंचाई वाढत आहे. त्यामुळे १३०० पेक्षा अधिक टँकरने पाण्याचा पुरवठा केला जात आहे. वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई पैठणमध्ये पाहायला मिळत आहे. एकट्या पैठण तालुक्यातील ८२ गावांमध्ये लाख ४४ हजार लोकांना १०४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जायकवाडी धरण बाजूला असतानाही या गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
गोदावरी नदीच्या काठावर यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या ११ बंधार्यांत केवळ टक्के पाणीसाठा आहे. या बंधार्यात २३१ दलघमी साठवणक्षमता असताना केवळ १४ दलघमी इतके पाणी शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील
आपेगाव, हिरडपुरी, जालना जिल्ह्यातील जोगलादेवी, मंगरूळ, लोणीसांवगी आणि परभणी जिल्ह्यातील ढालेगाव, मुदगल, मुळी हे बंधारे कोरडे पडले आहेत. राजाटाकळी बंधार्यात १६ टक्के, दिग्रसमध्ये टक्के आणि आमदुरा बंधार्यात २७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
८३३ प्रकल्पांत केवळ दहा टक्के पाणीसाठा
मराठवाड्यात मोठे, मध्यम, लघु, गोदावरी नदीवरील बंधारे आणि मांजरा नदीवरील बंधारे असे ८३३ प्रकल्प आहेत. यामध्ये केवळ दहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे १३०० पेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
मध्यम प्रकल्पात केवळ ९ टक्के पाणी
औरंगाबाद जिल्ह्यात १६ मध्यम प्रकल्प असून त्यांची क्षमता २०५ दलघमी आहे. मात्र या प्रकल्पात केवळ १९ दलघमी म्हणजेच ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सुखना लाहुकी, गिरजा, वाकोद, टेंभापुरी, ढेकू, कोल्ही, नारंगी, बोरदहेगाव हे प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर ९० लघु प्रकल्पात १८४ दलघमी क्षमता असताना केवळ १४ दलघमी म्हणजे टक्के पाणी शिल्लक आहे. वैजापूर तालुक्यात ८८, औरंगाबादमध्ये ७९, फुलंब्री ४३ आणि गंगापूर तालुक्यात ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.