आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठही जलप्रकल्प कोरडेठाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - यावर्षी झालेल्या अल्प पर्जन्यमानामुळे वाळूज परिसरातील आठही धरणे व तलाव हिवाळ्यातच कोरडे पडले असून परिसरातील गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. पाण्याअभावी जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही भेडसावण्याची शक्यता शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

यंदा पाऊस वेळेवर झाला. मात्र, तो कमी पडल्यामुळे मागील वर्षीप्रमाणे गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. परिसरातील आठपैकी सात लघु तलाव व टेंभापुरी मध्यम प्रकल्प डिसेंबर महिन्याच्या अखेरीस कोरडे पडले आहेत. परदेसवाडी लघु प्रकल्प, तिसगाव, घाणेगाव, शरणापूर, करोडी, साजापूर व वडगाव कोल्हाटी या तलावांमध्ये पाणीच शिल्लक नाही. लघुप्रकल्प, धरणे कोरडे पडल्यामुळे जनावरांना खाम नदीतील दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. तलाव परिसरातून विविध गावांच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. तलावात पाणी नसल्याने या योजनाही अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. परिणामी हिवाळ्यातच पाणी आटल्याने येणार्‍या उन्हाळ्यात परिसरातील गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

विहिरींच्या पाणीपातळीतही घट
परिसरात मागील तीन वर्षांपासून कमी पाऊस होत आहे. त्यामुळे पाणीसाठे कोरडे पडले आहेत. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रo्न गंभीर बनला आहे. हातपंपांसह विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. यंदाचा उन्हाळा कडक जाणार यात शंका नाही. विनायकराव दहिफळे, शेतकरी, देहडा

जनावरांचे हाल
हिवाळ्यातच उन्हाळ्याची चाहूल लागत असल्याने जनावरांचे कसे होणार? या चिंतेत आम्ही आहोत. चारा-पाण्याअभावी जनावरांच्या शरीराची केवळ हाडेच शिल्लक राहत आहेत. दगडू मातकर, शेतकरी, वाळूज