आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमधील हर्सूल तुरूंगात कैद्यांना आठवड्यातून दोन वेळाच आंघोळ!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. औरंगाबादमधील हर्सूल तरुंगातील कैद्यांना आता आठवड्यातून दोनच दिवस आंघोळ करता येणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत तुरुंग प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

औरंगाबादमधील हर्सूल तरुंग परिसरात तीन विहिरी आहेत. परंतु त्यातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. सध्या तरुंगात टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे तरुंगातील कैद्यांना आता आठवड्यातून दोन वेळाच आंघोळ करता येणार आहे.

सहाशे कैद्यांची क्षमता असणार्‍या या तरुंगात सध्या 1300 कैदी आहेत तर अडीचशे अधिकारी आहेत. पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्याने सध्या तुरुंगात टॅंकरने पाणी पुरवडा केला जात आहे. टॅंकरच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करण्याला प्राधान्य देण्याची गरज असल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.