आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा लेणीत पाण्याची बोंब! पर्यटकांची भटकंती, चार टाक्यांचा उपयोग नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा - कमी विद्युत पुरवठय़ामुळे अजिंठा लेणीत मंगळवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. मंगळवारी दिवसभर लेणीत पाण्याची निर्जळी होती. त्यात तापमान चाळीस अंशांवर होते. त्यामुळे पर्यटकांचे अतोनात हाल झाले.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत सध्या कृत्रिम पाणीटंचाई भासत आहे. मागच्या आठवड्यात पाइप गळतीमुळे लेणीत तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प होता. त्यातच मंगळवारी लो व्होल्टेज असल्याने दिवसभर पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे लेणी बघायला आलेल्या पर्यटकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल झाले. कृत्रिम पाणीटंचाई .. अजिंठा लेणीत मागच्या आठवड्यात तीन दिवस पाइप लिकेजमुळे पाणीपुरवठा बंदा होता. तो दुरुस्त झाला नाही तोच मंगळवारी लो व्होल्टेजमुळे लेणीत दिवसभर पाणीपुरवठा होऊ शकला नाही. तोंडापूर धरणातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत लेणीला पाणीपुरवठा होतो. लोडशेडिंगमुळे वारंवार पाणीपुरवठय़ावर परिणाम होत आहे. गेल्या दहा दिवसांत चार वेळा पाणीपुरवठा बंद झालेला आहे.

हाल झाले
अजिंठा लेणी पाहायला आलो होतो. दुपारी ऊनही जास्त होते. मात्र, कुठेच पिण्याचे पाणी मिळाले नाही. पाण्याअभावी अक्षरश: चक्कर येत होती. विनोद पाटील, जळगाव, पर्यटक
लो व्होल्टेज
लेणीला पाणीपुरवठा करण्यासाठी तीनशेच्या वर व्होल्टेज लागते. आज अचानक व्होल्टेज कमी झाले होते. त्यामुळे लेणीला पाणीपुरवठा करता आला नाही.

पुरातत्त्व विभागाने आणीबाणीच्या स्थितीत पाण्याची टंचाई भासू नये, म्हणून दहा हजार लिटरची एक अशा पाण्याच्या चार टाक्या लेणीत साठवून ठेवलेल्या आहेत. मात्र, त्यात पाण्याची साठवणूक होत नसल्याने पर्यटकांना दिवसभर पाणी मिळू शकले नाही.