आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीस दिवसांनंतर पाणीकपात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जून संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्याने पाण्याची समस्या गंभीर होण्याची चिन्हे आहेत. गतवर्षी दुष्काळात खोदलेल्या अ‍ॅप्रोच कॅनॉलमुळे सध्या औरंगाबादकरांना पुरेसे पाणी मिळत असले तरी आगामी 20 ते 25 दिवस पावसाने दडी मारली तर मात्र गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत दोन दिवसांआड येणारे पाणी तीन दिवसांआड पुरवण्याची वेळ मनपावर येणार आहे.

14 लाख लोकसंख्येच्या औरंगाबादचा पाणीपुरवठा जायकवाडी धरणावर अवलंबून आहे. जायकवाडीतील जलसाठा हा वरच्या 11 धरणांतील पाणीसाठ्यांवर अवलंबून आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून महिना संपत आला तरी पाऊस न आल्याने धोक्याची घंटा वाजली आहे. पाऊस आणखी लांबला तर येणारे महिने कठीण जाणार आहेत. शहराच्या पाणीपुरवठ्यावर कपातीची कुºहाड कोसण्याची भीती आहे. औरंगाबादचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 700 मिमी आहे. त्यापैकी 70 ते 100 मिमी पाऊस जून महिन्यात पडतो, असे मागील 30 वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. यंदा पावसाचा पत्ता नाही. जी स्थिती औरंगाबादची तीच स्थिती नगर व नाशिकची आहे. नगर व नाशिक जिल्ह्यातील 11 धरणांवर जायकवाडीचा जलसाठा अवलंबून असल्याने पाण्याबाबत अनिश्चिततेची स्थिती आहे. औरंगाबाद शहराला दररोज 150 ते 160 एमएलडी पाणी पुरवले जाते. धरणाच्या मागील भागात गतवर्षी दुष्काळादरम्यान अ‍ॅप्रोच कॅनॉल खोदण्यात आल्याने शहराचा घसा कोरडा होण्यापासून वाचला होता. आजही हाच अ‍ॅप्रोच कालवा मनपाच्या मदतीला धावून आला आहे. पण पुढील 20 ते 25 दिवस पाऊसच झाला नाही तर मात्र पाणी संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज शहराला दोन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा तीन दिवसांआड केला जाऊ शकतो.
पण पाऊस येईलच
मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी मात्र अशी टोकाची अवस्था येईल, असे आताच सांगणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. गतवर्षी दुष्काळात मनपाने अ‍ॅप्रोच चॅनलच्या माध्यमातून पाणीपुरवठा जुलै महिन्यापर्यंत ओढला होता याची आठवण त्यांनी करून दिली. ते म्हणाले की, आता जरी कुठेच पाऊस नसला तरी तो येईलच. त्यामुळे टोकाची टंचाई होणार नसल्याची आशा आहे.