आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टंचाई: २० टँकरची तहान चारवरच भागवली!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सातारा-देवळाईतील पाणीप्रश्न पेटला असताना महापौर त्र्यंबक तुपे यांनी तत्काळ पाण्याचे टँकर सुरू करण्याचे आदेश दिले. पहिल्याच दिवसापासून (सोमवार) २० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे ठरले होते. परंतु पाच हजार लिटरच्या चार टँकरद्वारे केवळ दोनच भागांमध्येच पाणी पुरवल्याने उर्वरित सातारा-देवळाई तहानलेलेच राहिले.
सातारा-देवळाईच्या महापालिकेतील समावेशाने किमान पाणी तरी मिळेल, अशी आशा बाळगणाऱ्या नागरिकांचा सोमवारी चांगलाच हिरमोड झाला. शहरातील पाणीप्रश्न पाहता पालिका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे साताऱ्याच्या पाण्यासाठी साकडे घालण्याचे ठरवले होते. परंतु रविवारी महापौर आमदार संजय शिरसाट यांना देवळाई भागातील महिलांनी धारेवर धरल्याने तुपे यांनी तात्काळ सोमवारपासूनच पाण्याचे टँकर सुरू करण्याचे आदेश दिले.
तोंडाला "पाणी' पुसले

- गेल्या आठ दिवसांत प्रशासनाकडून होणारा पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली.
- सोमवारी पालिकेचे चार टँकर साताऱ्यामध्ये दाखल झाले.
- नगर परिषदेच्या वतीने रोज १२ हजार लिटरच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. परंतु पालिकेने केवळ पाच हजार लिटरचे पाण्याचे टँकर पाठवले.
- सातारा गावात टँकरच्या तीन फेऱ्या तर छत्रपतीनगरमध्ये पाच फेऱ्या करण्यात आल्या.
महापौर म्हणतात, १४ टँकर दिले
महापौर त्र्यंबक तुपे यांनी १४ टँकरने सातारा देवळाई परिसराला पाणीपुरवठा केल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, आधी जिल्हा प्रशासन चार दिवसाआड एकाला एक ड्रम पाणी पुरवत असे. पण मनपाने आजपासून १४ टँकरच्या माध्यमातून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला आहे. उद्यापासून २० टँकर मिळतील. नागरिकांना पाणी कमी पडू दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हजार लोकसंख्या
५०
पाण्याचे टँकर
०४