आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खारी खामगाव धरणात पाणीसाठा असून अडचण, वैजापुरात पावसाअभावी खाेळंबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड तालुक्यातील औराळा भागात कमी पाऊस झाला असताना खारी खामगाव धरणात चांगले पाणी आहे. - Divya Marathi
कन्नड तालुक्यातील औराळा भागात कमी पाऊस झाला असताना खारी खामगाव धरणात चांगले पाणी आहे.
औराळा- कन्नड तालुक्यातील औराळा भागातील पंधरा गावांना अतिशय महत्त्वाची असलेली संयुक्त पाणीपुरवठा याेजना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पूर्ण करण्याचे आश्वासन या भागातील नागरिकांना वेळोवेळी कार्यक्रमाच्या माध्यमातून दिले. खारी खामगाव धरणातून संयुक्त पाणीपुरवठा याेजनेचा सर्व्हे करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संस्थेच्या अधिकाऱ्यांना दिले हाेते. या याेजनेला सुमारे दहा ते बारा काेटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने ही याेजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही संस्था करणार असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले हाेते. परंतु सर्व्हे हाेऊन दाेन वर्षे अद्याप या याेजना सुरू हाेण्याची कुठलीच चिन्हे दिसत नाहीत. 

गेल्या पाच वर्षांपासून या भागात पडत असलेल्या सततच्या दुष्काळामुळे औराळा, औराळी, शेराेडी, विटा, गव्हाली, तांडा, कविटखेडा, चिंचखेडा, बिपखेडा, धनगरवाडी, हसनखेडा, सासेगाव, कानडगाव, खापरखेडा, पळसखेडा भागातील ग्रामस्थांना बाराही महिने भीषण पाणीटंचाईला सामाेरे जावे लागत असल्याने या भागातील नागरिकांना सर्व कामे साेडून पाण्यासाठी रानाेमाळ भटकंती करावी लागते आहे. या पंधरा गावांचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न साेडायचा असेल तर योजना गरजेची आहे. याविषयी आमदार जाधव यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. 

योजना यशस्वी झाल्या 
खारीखामगावधरणाला माेठ्या महादेवाच्या डाेंगरापासून पाणी येते. त्यामुळे कमी पाऊस झाला तरी हे धरण भरते. त्यामुळे येथे आतापर्यंत झालेल्या दहा गावांच्या पाणीपुरवठा याेजना यशस्वी झाल्या आहेत. 
- बाळासाहेब वाघ, सरपंच, औराळा 

पाणीप्रश्न सुटेल 
वास्तविकटाकळीआणि खारी खामगाव ही दाेन्ही धरणे चुकीच्या ठिकाणी झाल्याने त्याचा कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी फार काही उपयाेग हाेत नाही. संयुक्त पाणीपुरवठा याेजनेच्या माध्यमातून १५ गावांचा प्रश्न सुटेल. 
- भाऊसाहेब थाेरात, प्रगतिशील शेतकरी 

याेजना झाल्या कुचकामी 
औराळा, औराळी, शेराेडी, चिंचखेडा, विटा या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व विहिरी या धरणात आहेत. या सर्व याेजनेसाठी शासनाने काेटी रुपये खर्च केले, परंतु या धरणात पाणी येत नसल्याने या याेजना कुचकामी झाल्या आहेत. 

पाच वेळेसच भरले धरण 
औराळापरिसरातील १५-२० खेड्यांची जमीन ओलिताखाली यावी यासाठी शासनाने १९७५ मध्ये औराळा येथे लाखाे रुपये खर्च करून धरण बांधले. परंतु ४० वर्षांत माेजून पाच वेळेस हे धरण भरले असल्याचे काही वयोवृद्ध मंडळी सांगतात. 
 
ऐन पावसाळ्यात वैजापूर तालुक्यात १९ प्रकल्प तळाशीच, शेतीवर संकट 
ऐन पावसाळ्यात तालुक्यातील लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे. पावसाअभावी १९ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्याचा परिणाम छोट्या धरणांच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीवर होत असून दुष्काळाचे ढग घोंगावत आहे. तर आधुनिक पद्धतीने शेतीचे व्यवस्थापन व्हावे यासाठी तयार केलेले शेततळेही कोरडे पडत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारलेले शेततळे कोरडेठाक पडले आहेत. पावसाने डोळे वटारल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक भागाला पेरलेले बियाणे वाया जाण्याची भीती सतावते आहे; तर उर्वरित भाग पेरणीच्याच प्रतीक्षेत आहे. जलप्रकल्पांनी तळ गाठल्याने तोंडचे पाणी पळाले आहे. हिरवा तर सोडाच; पण कोरडा चारा मिळवायचा तरी कुठून, असा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. 

जूनच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावून दुष्काळात आशेचा किरण दाखविणाऱ्या पावसाने पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने हे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुळातच दुष्काळाचा सामना करणारा वैजापूर तालुका उन्हाळ्यात आधीच टँकरच्या पाण्यावर होता. पाण्याअभावी शेतीचे काही खरे नव्हतेच; त्यामुळे खरिपावर नजरा होत्या. यंदा मृगातच पेरणीची संधी मिळाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण होते; मात्र पावसाने माघार घेतल्याने त्यावर विरजण पडले. त्यामुळे परिसरातील विहिरींचा पाणीसाठा कमालीचा घटला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा तुटवडा जाणवू लागल्याने शेतकऱ्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे.

पेरणी जाणार वाया 
मृगाच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवर खरिपाची पेरणी केली होती. तालुक्यातील एकत्रित पेरणीचा टक्का बरा वाटत असला तरी पावसाअभावी गंगथडी भागातील पेरणीचा टक्का अर्ध्यावर असून अजूनही हजारो क्षेत्रावर पेरणी होण्याचे बाकी आहे. असे असताना जो पेरा झाला तोच आता पावसाअभावी जळत आहे. त्यामुळे पावसाअभावी हजारो हेक्टरवरील पिके हातची जाण्याची परिस्थिती उद्भवली आहे. पावसाने गंगथडी भागावर वक्रदृष्टी करून आज साधारण एक महिना झाला आहे. दुष्काळाच्या वणव्यात परिसरातील शेतकरी सापडण्याच्या स्मृतिरेखा तयार होताना दिसत आहे. 
बातम्या आणखी आहेत...