आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या शोधात पाडसाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणीखुर्द - टंचाईच्या भीषण परिस्थितीचा सामना पशू-पक्ष्यांनाही करावा लागत असून पाण्याच्या शोधात त्यांचा बळी जात असल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांच्यासाठी जंगलांमध्ये पाणवठे तयार करण्याची मागणी प्राणिमित्रांकडून जोर धरत आहे.

पाण्याच्या शोधात भटकलेल्या हरणाच्या पाडसाचा वैजापूर तालुक्यातील बळ्हेगाव येथील पोपट रामहरी सूर्यवंशी यांच्या गट नंबर १३५ या शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. वन विभागाच्या कर्मचाऱ्याने जनार्दन मगर, पांडुरंग सूर्यवंशी, अजिनाथ सूर्यवंशी, सदाशिव सूर्यवंशी, भागीनाथ सूर्यवंशी, शिवा काटे, विलास पाटील, विजय बोडखे यांच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढले. यापूर्वीही पाण्याच्या शोधात बिबट्या बळ्हेगावच्या वस्तीत शिरला होता. त्या वेळी त्याने बकरीसह जणांना जखमी केले होते. या भागातील पाणवठे कोरडे पडले असून वन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

पाणवठे कोरडे ठाक
तालुक्यातील मन्याड खोरे येथील वन विभागाच्या हद्दीत प्राणी पक्ष्यांसाठी पाणवठे तयार केलेले आहेत, परंतु दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत असतानादेखील पाणवठ्यातील साठवणुकीकडे वन विभागाने डोळेझाक केली आहे.