आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीच्या पाण्यावर दरोडा, पश्चिम महाराष्ट्राने पळवले मराठवाड्याचे पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवगाव तालुक्याच्या एरंडगाव शिवारात शेतकऱ्यांनी समांतर कालवे करून सर्रास उपसा सुरू केला. - Divya Marathi
शेवगाव तालुक्याच्या एरंडगाव शिवारात शेतकऱ्यांनी समांतर कालवे करून सर्रास उपसा सुरू केला.
पैठण - मराठवाडा दुष्काळात होरपळत असून पश्चिम महाराष्ट्रात मात्र जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून २४ तासांत समांतर कालवा, चर खोदून सर्रास पाणी उपसा सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पैठण तालुक्यातील अमरापूर शिवारात बॅकवॉटरमधून चर खोदण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन शेतकऱ्यांवर पाटबंधारे विभागाने कारवाई करत गुन्हे दाखल केले. एकीकडे सर्रास पाण्यावर दरोडा, तर दुसरीकडे कारवाई असा प्रकार सुरू असल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांत रोष व्यक्त होत आहे.
जायकवाडीचा साठा मृतसाठ्यात आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पैठण लगतच्याच शेवगाव तालुक्यातील एरंडगाव भागात आज "दिव्य मराठी'ने पाहणी केली असता हा प्रकार समोर आला. चर, समांतर कालवे तयार केले असून त्यातून २४ तास शेतीला पाणी उपसा होत आहे. वीजपुरवठा काही तास बंद असला तरी इंजिन व ट्रॅक्टरवर कृषिपंप बसवून उपसा करण्याची शक्कल लढवण्यात आली आहे.

पुढे वाचा, ...आता पाणी चोरी, करताहेत टोलवाटोलवी... शेतकरी करणार आंदोलन....