आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणच्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा 81वरून 31 टक्क्यांवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांतून सिंचनाला आवर्तन सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा आता ८१ टक्क्यांवरून ३१ टक्क्यांवर आला आहे. उन्हाळ्याअखेर साठा पाच टक्क्यांवर येईल. यंदा चार वर्षांत पहिल्यांदाच बाष्पीभवनाचे प्रमाण  वाढल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना तसेच नगर जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाण्यावर परभणी, नांदेडची शेती ओलिताखाली येते.  यंदा सलग या पाच जिल्ह्यांतील पावणेदाेन लाख हेक्टरवरील शेतीसाठी सात पाणी पाळ्या दिल्या जात आहेत. सध्याही धरणाच्या डाव्या कालव्यातून ८०० क्युसेकने, तर उजव्या कालव्यातून ९०० क्युसेक वेगाने पाणी सिंचनासाठी सोडण्यात येत आहे.  उन्हाळ्यातील ही दुसरी पाणी पाळी असून परभणीसाठी या आठ दिवसांत आणखी पाणी सोडले जाणार आहे. मात्र जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत अाहे.  वेळेत पाऊस झाला नाही तर पुन्हा मृतसाठ्यातून पाणी उपसा करण्याची वेळ येऊ शकते. मात्र या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
 
बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले  : कालव्याच्या दुरुस्तीवर कोटी रुपयांचा खर्च करूनही कालव्यातून जास्तीच्या पाण्याचा अपव्यय होत आहे.  चार वर्षांत पहिल्यांदाच तापमान वाढले असून धरणाचा पाणीसाठाही वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण अर्धा टक्क्याने वाढले. दरवर्षी जायकवाडी धरणातील पाण्याचे साधारणपणे बाष्पीभवन हे एक दलघमीच्या दरम्यान राहत होते. यंदा मात्र याच्या प्रमाणात वाढ मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
 
वेळेत पाऊस न झाल्यास जलसंकट  
सध्या पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. आणखी दीड महिन्यात पाणीसाठा पाच टक्क्यांवर येऊ शकतो.  त्यामुळे आगामी काळात  जायकवाडीवर अवलंबून असलेल्या औरंगाबाद, जालना येथील उद्योगांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
 
८ दिवसांतील बाष्पीभवन  (दलघमीमध्ये) 
२६ एप्रिल  @ १.७४७
२५ एप्रिल @ १.७७९
२४ एप्रिल @ १.७४१
२२ एप्रिल @ १.७५८
२१ एप्रिल @ १.७६६
२० एप्रिल @ १.७७५
२३ एप्रिल २०१७ : @ १.६४१  

रोज लागणारे पाणी (दलघमीमध्ये)
५० औरंगाबाद ग्रामीण
२२  जालना जिल्हा
५० औरंगाबाद शहर
१८३३२२  
मराठवाड्यातील ओलिताखालील 
क्षेत्र.(हेक्टर की एकर?)
बातम्या आणखी आहेत...