आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील धरणांत फक्त सहा टक्के जलसाठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जून महिन्यात मागील वर्षांच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाला आहे. मात्र, मराठवाड्यातल्या एकूण प्रकल्पात फक्त सहा टक्के पाणी साठा आहे. विशेष म्हणजे जायकवाडी, येलदरी, मांजरा, सिद्धेश्वर, माजलगाव आणि निम्न तेरणा आदी धरणांत शून्य टक्के पाणी साठा आहे. एकीकडे राज्यामधील विदर्भ, कोकणातील धरणे भरत असताना मराठवाडा अजूनही कोरडाच आहे.

दुष्काळजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र पाण्याची भीषण टंचाई होती. मराठवाड्यातील धरणात पाणीसाठा शिल्लक नव्हता. जुलै महिना सुरू झाला तरीही मराठवाड्यातील धरणात पाणीसाठय़ात मात्र फारशी वाढ झालेली नाही. राज्यात गोसीखुर्द तसेच काही धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. मात्र, मराठवाड्यात विरुद्ध परिस्थिती आहे. मराठवाड्यात साधारणत: जुलै महिन्यात पावसाला सुरुवात होते. यावर्षी जून महिन्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील विष्णूपुरीमध्ये 12 टक्के , मनार- 7 टक्के आणि ऊध्र्व पैनगंगेत 28 टक्के पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यातल्या अकरा मध्यम प्रकल्पांत पाच टक्के पाणीसाठा आहे. 75 मध्यम प्रकल्पांत 11 टक्के पाणीसाठा आाहे.लघु प्रकल्पांतल्या पाणीसाठय़ात अजूनही वाढ झालेली नाही. त्यामुळे मराठवाड्यातल्या 717 लघु प्रकल्पांत फक्त सहा टक्के पाणी आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा शून्य टक्के आहे.

जायकवाडीत सध्या मृत पाणीसाठय़ामध्ये 609 द.ल.घ.मी पाणीसाठा आाहे. एक जूनपासून आतापर्यंत झालेल्या पावसामुळे फक्त 13.79 द.ल.घ.मी पाणीसाठा वाढला आहे. गेल्या वर्षी जायकवाडीत जूनमध्ये 748 द.ल.घ.मी. पाणीसाठा होता. परभणी जिल्ह्यातील येलदरीमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. येलदरी धरणात मृत पाणीसाठा 91.90 द.ल.घ.मी आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या सिद्धेश्वरमध्ये 152 द.ल.घ.मी. माजलगावमध्ये 68.60 द.ल.घ.मी. मांजरामध्ये 9.23 60 द.ल.घ.मी. निम्न दुधना प्रकल्पात 45.96 द.ल.घ.मी. आणि सिनाकोळेगावमध्ये 18.98 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. त्यामुळे अजूनही मराठवाड्यातल्या पाणीसाठय़ांमध्ये वाढ झालेली नाही.
जायकवाडीत फक्त 13 60 द.ल.घ.मी. पाणी

जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अजूनही फारसा पाऊस झालेला नाही. आतापर्यंत जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात 92 ते 164 मिलिमीटर पाऊस झाला आहे. एक जूनपासून ते 27 जूनपर्यंत जायकवाडीत फक्त 13 60 द.ल.घ.मी. पाणी साचले आहे. शहराला दररोज 140 एम.एल.डी. पाणी लागले. त्यानुसार पंधरा दिवस लागणारे पाणी सध्या जायकवाडी धरणात आहे. वरच्या धरणातही पाणीसाठा वाढला नाही. साधारणत: जुलै महिन्यात वरच्या धरणातही पाणीसाठा वाढण्यास सुरुवात होते. जुलैमध्ये पावसाचा साठा वाढू शकतो, असे मत कडा विभागाचे शाखा अभियंता एन. हिरे यांनी व्यक्त केले आहे.