आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बीआयएस' चे नियम धाब्यावर बसवून पाण्याची सर्रास विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अनेकलोकल कंपन्यांनी अन्न औषध प्रशासन तसेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचे (बीआयएस) नियम धाब्यावर बसवून पाण्याच्या बाटल्यांची सर्रास विक्री सुरू केल्याने दिवसेंदिवस त्यांच्या किमती वाढत आहेत. त्यातच कूलिंग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होत आहे. याकडे अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.

शहरात असंख्य दुकानांवर मिनरल वॉटरच्या नावाने अनेक लोकल कंपन्यांचे पाणी विकले जात आहेत. अधिकचा नफा कमावण्याच्या उद्देशाने दुकानदार गुणवत्तापूर्ण पाण्याच्या बाटल्या विकत नसल्याने ग्राहकांना आजार उद््भवतात. कोणत्याही कंपनीला ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (बीआयएस ) नुसार पाणी विकणे बंधनकारक आहे. बीआयएसच्या प्रमाणपत्रानंतरच अन्न औषध प्रशासनाकडून अन्न परवाना दिला जातो. अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ नुसार हा परवाना देण्यात येतो. पण विकण्यासाठीचे मिनरल पाणी खरोखरच पिण्यायोग्य आहे का, याची तपासणी केली जात नसल्याने लोकल पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर विकणाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे समोर आले आहे. फक्त मोजक्याच नामांकित कंपन्यांच्या लेबलवर ‘अॅडेड विथ मिनरल’ असे लिहिलेले असते. त्यांच्या बॉटलमध्ये मिनरल, पाेटॅशियम, मॅग्नेशियम, ऑक्सिजन अॅड करून फिल्टर करण्यात येत असल्याने या पाण्याची चवही वेगळी लागते.

करांमुळेवाढतात किमती... :गेल्या १० ते १५ वर्षांपूर्वी दहा रुपये, बारा रुपयांत पाणी बॉटल मिळत असे. पण पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर तयार करणाऱ्या अनेक कंपन्या असूनही किंमत कमी होत नाही. एक्साइज, कर, वाहतूक, मनुष्यबळाचा खर्च वाढल्याने किमती वाढल्या आहेत. व्यवसायात स्पर्धा असली तरी किंमत कधीच कमी होत नसल्याचे नामांकित पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर कंपनीचे म्हणणे आहे. याउलट लोकल कंपन्यांना उत्पादन खर्च कमी येतो, शिवाय काही कंपन्या टॅक्सदेखील व्यवस्थित भरत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तरीही या कंपन्या इतर नामांकित कंपन्यांच्या दराप्रमाणेच त्यांच्या पाण्याच्या बाटल्या विकतात. संबंधित यंत्रणेचे लक्ष नसल्याने अशा कंपन्यांचा धंदा तेजीत सुरू आहे.

नाकर्तेपणामुळे ही वेळ
बिसलरीच्याएका बॉटलमागे फक्त ते रुपये मिळतात, तर इतर लोकल कंपन्यांच्या बॉटलमागे १३ ते १४ रुपये मिळत असल्याने लोकल कंपन्यांचा माल जास्त दुकानदार ठेवतात. यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो, पण प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ग्राहकांना नाइलाजाने हे पाणी प्यावे लागते. फैजानपटेल, एरिया मॅनेजर, बिसलरी

संपर्क साधावा
उन्हाळ्यातखप खूप असल्यामुळे त्यापूर्वी आम्ही पाण्याच्या बॉटल्सची तपासणी करत असतो. इतर वेळीही नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले जातात. बॉटलमध्ये काही आढळून आलेच तर अन्न औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त यांच्याशी संपर्क साधावा. सी.बी. पवार, सहआयुक्त, अन्न औषध प्रशासन विभाग

पाण्यालादेखील असते एक्स्पायरी...
पॅकेज्डड्रिंकिंग वॉटर उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना प्रशासनाने फक्त महिन्यांची एक्स्पायरी डेट ठरवून दिलेली असताना अनेक कंपन्यांच्या बॉटलवर मॅन्युफॅक्चरिंग डेटच नसल्याने अनेक काळापर्यंत ठेवून ती विकण्यात येते. ग्राहकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत अन्न औषध प्रशासन विभागाने व्यक्त केले आहे.

मार्जिनपेक्षा जास्त पैसे घेऊन लूट...
नामांकितकंपन्यांना एक बॉटल तयार करण्यासाठी १२ रुपये खर्च येतो. लोकल कंपन्यांना त्यासाठी फक्त रुपये खर्च येतो. पण दुकानात या दोन्ही कंपन्यांची पाण्याची बाॅटल १८ ते २० रुपयांना विकली जाते. कहर म्हणजे काही दुकानदार कूलिंग चार्जेसच्या नावाखाली जास्तीचे ते रुपये ग्राहकांकडून घेतात. एमआरपीपेक्षा जास्त पैसे घेणे गुन्हा आहे. याबाबत ग्राहकांनी जागरूक असणे गरजेचे आहे.