आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शनिवारी १६ तासांचे शटडाऊन घेत दुरुस्तीचे काम झाल्यावरही फारोळ्यात पहाटे जलवाहिनीला गळती सुरू झाल्याने कसाबसा सुरू झालेला पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला. परिणामी उद्या परवा शहराच्या काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.
काल जानेवारी रोजी औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटी कंपनीने दुरुस्ती सुधारणेच्या कामांसाठी तासांचे शटडाऊन घेतले होते. १२ तासांच्या ऐवजी १६ तास शटडाऊन घेत हे काम काल रात्री १२ वाजेच्या सुमारास पूर्ण झाले. मध्यरात्रीनंतर पाणीपुरवठा दोन्ही जलवाहिन्यांतून सुरू झाला.
पण दोन तासांतच फारोळ्यातील जलशुद्धी केंद्राजवळ ७०० मिमी पाइपलाइनला गळती सुरू झाली. परिणामी ही जलवाहिनी बंद करण्यात आली दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. आज रविवारी हे काम पूर्ण झाले त्यानंतर काही चाचण्या घेऊन दुपारी वाजेच्या सुमारास या जलवाहिनीतूनही पाणीपुरवठा सुरू झाला. आता शहरात दोन्ही जलवाहिन्यांतून पाणी येत असले तरी टाक्या भरण्याचे वेळापत्रक मात्र विस्कळीत झाले. कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गळती विलंबाचा परिणाम एन-७ शहागंजातील टाक्यांवरून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे. परिणामी शहराचा बराच भाग यामुळे पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. कंपनीने मात्र रविवारी रात्रीपर्यंत टाक्यांची स्थिती पूर्ववत होऊन पाणीपुरवठा बऱ्याच अंशी सुरळीत राहील, असा दावा केला आहे.
फारोळ्यात पाइपलाइन दुरुस्तीचे काम झाले.