आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळवलेल्या पाण्याचा अहवाल सादर करा, गोदावरी महामंडळाच्या कार्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ओझर वेअरमधून सोडलेले पाणी जायकवाडीत पोहोचण्यापूर्वीच कालव्याच्या माध्यमातून कसे पळवले जाते, या वास्तवावर "दिव्यमराठी’नेरविवारी (७ ऑगस्ट) प्रकाशझोत टाकला. या वृत्ताची दखल घेत पाणी पळवण्याच्या प्रकाराचा अहवाल सादर करावा, असे आदेश गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी.ए.बिराजदार यांनी दिले आहेत.
"दिव्यमराठी’च्याप्रतिनिधीने दोन दिवस ओझर वेअर ते मधमेश्वरपर्यंतच्या प्रवराच्या १५ बंधाऱ्यांची पाहणी केली. कालवे सुरूच असून बंधाऱ्याचे गेटही उघडले नसल्याचे वास्तव यातून समोर आले. याबाबत रविवारी वृत्त प्रकाशित होताच मराठवाड्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नगरमध्ये सातत्याने पाणी अडवले आणि वळवले जाते. नगरप्रमाणे मराठवाड्यातून राजकीय दबाव तयार होत नसल्याने पाणी वळवले जातेय, अशी प्रतिक्रिया जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी व्यक्त केली. जायकवाडी भरेपर्यंत कालव्यातून पाणी सोडू नये, या नियमांची अंमलबजावणी होत नाही. मेढेगिरी समितीच्या शिफारशी आणि जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचेही याबाबत आदेश असतानाही त्याचे पालन होत नसल्याचे पुरंदरे यांनी सांगितले.

अहवालानंतर कारवाई : पाणीवळवल्याची आणि बंद गेटची छायाचित्रे प्रकाशित होताच जलसंपदा विभागात खळबळ उडाली असून नगरमधील स्थितीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे कडा औरंगाबाद विभागाला देण्यात आले आहेत. तसेच नाशिकच्या अधीक्षक अभियंत्यांनाही बंधाऱ्याचे गेट काढण्याच्या सूचना दिल्या अाहेत, असे बिराजदार यांनी सांगितले. अशा सूचना मिळाल्याच्या माहितीला नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे यांनी दुजोरा दिला आहे.

जायकवाडीत आवक सुरू : ओझरवेअरच्या बंधाऱ्यावरून गुरुवारी सकाळी ६३२९ क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी २१२२ क्युसेक, तर शनिवारी रात्री बारा वाजता १८९५, तर रविवारी पहाटे एक वाजता २३४६ क्युसेकपर्यंत वाढ करण्यात आली. रविवारी संध्याकाळी सहा वाजता २८३० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे जायकवाडीत रविवारी संध्याकाळी सहा वाजता ९०० क्युसेक पाणी यायला सुरुवात झाली आहे. बंधाऱ्याचे गेट काढल्यामुळे प्रवराच्या बंधाऱ्यातच हे पाणी अडवले होते.

ऑगस्टरोजी उच्च न्यायालयात सुनावणी : जायकवाडीच्यावरच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस होऊनही पाणी सोडण्याऐवजी ते वळवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह संबंधित यंत्रणेला फैलावर घेतले होते. पाऊस झाल्यानंतरही पाणी का रोखले याचा खुलासा करण्यासाठी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबत संजय लाखे पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली होती.

जलसंपदामंत्र्यांनी आता लक्ष द्यावे
^जायकवाडीत नगरचे येण्याबाबत "लबाडाचेआमंत्रण’अशीच स्थिती आहे. मराठवाड्याचे पाणी वळवले जात असल्याचे दाखवून द्या, असे सांगणारे जलसंपदामंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे. महामंडळाचे अधिकारी पाणी वळवून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत आहेत. शंकरराव नागरे, सदस्य, मराठवाडा विकास मंडळ

हा तर अधिकाऱ्यांचा उद्दामपणा
^उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही कालव्यातून पाणी सोडणे हा अधिकाऱ्यांचा उद्दामपणा आहे. महांमडळ आणि त्यांचे अधिकारी कायद्याला मानत नाही असेच हे लक्षण आहे. दिव्य मराठीच्या वृत्तामुळे महामंडळाच्या कारभारातील फोलपणा पुन्हा उघड झाला आहे. महामंडळाने संबंधितांवर कारवाई करावी. संजय लाखे पाटील, याचिकाकर्ते

नगरचा पाहणी अहवाल मागवला
^नगरमध्ये कालव्यातून सोडलेल्या पाण्याचा अहवाल मागवला आहे. गेट काढण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल. सी.ए.बिराजदार,कार्यकारी संचालक, गोदावरी पाटबंधारे महामंडळ
बातम्या आणखी आहेत...