आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शटडाऊनमुळे ऐन सणासुदीत पाणी पाणी.. म्हणण्याची वेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जायकवाडी पासूनते शहरातील वेगवेगळ्या भागांतील लहान-मोठ्या गळत्या रोखणे तसेच काही व्हॉल्व्ह दुरुस्त करण्यासाठी गुरुवारी सकाळी १० ते शुक्रवारी सकाळी असे २३ तासांचे शटडाऊन करण्यात येणार आहे. या काळात जायकवाडीतून पाणी उपसणे बंद राहणार असल्याने शहरात पाणी येण्यासाठी तसेच जलकुंभ भरण्यासाठी 8 किमान तास लागतील. त्यानंतर शहरात पाणी येण्यास सुरुवात होईल. सध्या शहराला तीन दिवसांआड पाणी देण्यात येत असल्याने एकूणच पुढील आठ दिवस (म्हणजे नरक चतुर्दशीपर्यंत) शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहील.
ऐन सणासुदीच्या दिवसांत शटडाऊन करण्यात येऊ नये ही नगरसेवकांची मागणी आयुक्त डॉ. ओमप्रकाश बकोरिया यांनी फेटाळून लावली. त्यामुळे हे शटडाऊन केले जात आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे दिवाळी सण साजरा करण्यासाठी नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागेल. काही भागातील नागरिकांना अभ्यंग स्नानासाठी पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न पडेल. या काळात ७०० तसेच १४०० मिलिमीटर अशा दोन्हीही वाहिन्यांतून शहरात येणारे पाणी थांबवून दुरुस्ती केली जाणार असून शुक्रवारी रात्रीनंतर शहरात पाणी येईल, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सत्तरसिंग चहल यांनी सांगितले.

सणासुदीत शटडाऊनचा इतिहास
पालिकेच्या इतिहासात आतापर्यंत बहुतांश वेळा सणासुदीच्याच दिवसांत शटडाऊन करण्यात आल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. या दिवसांत पाण्याची मागणी वाढते. ती पूर्ण करणे शक्य होत नाही. त्याची कारणे शोधली असता गळती तसेच विद्युत पुरवठ्याची गडबड समोर येते. त्याच्या दुरुस्तीसाठी शटडाऊन घेतले जाते. गतवर्षीही नवरात्र तसेच दिवाळीच्या दिवसांत शटडाऊन करण्यात आले होते. रमजानच्या दिवसांतही शटडाऊन करण्यात आले आहे.

शुक्रवारी काय होऊ शकते?
{दुरुस्तीचे काम शुक्रवारी सकाळी वाजता संपेल, असे अपेक्षित आहे. हे काम वेळेत संपले तरच पंपिंग सुरू होईल. म्हणजेच मोटारी सुरू होऊन ७०० १४०० मिलिमीटर व्यासाच्या वाहिन्यांतून शहराकडे पाणी येण्यास सुरुवात होईल.
{२३ तासांच्या काळात सर्व पाइप रिकामे झालेले असतील. त्यातच चढाच्या दिशेने हे पाणी येईल. त्यामुळे सर्व पाइप भरून जलकुंभापर्यंत पाणी येण्यास तास लागतील.
{सायंकाळी शहरात पाणी येण्यास सुरुवात होईल. त्यानंतर जलकुंभ भरण्यास किमान तीन ते चार तासांचा अवधी लागेल. त्यानंतर काही भागाला पाणी सोडण्यात येईल. शनिवारी काही भागाला, तर रविवार अन् सोमवारी उर्वरित भागाला पाणी सोडले जाईल.
{जर मधल्या काळात कोठे वाहिन्या फुटल्या नाहीत, विद्युत पुरवठा खंडित झाला नाही तर पाणीपुरवठा सुरळीत होईल. एकूणच या धामधुमीत आठवडा जाणार आहे.
अनेक ठिकाणी गळत्या तसेच व्हॉल्व्ह नादुरुस्त असल्याने पाण्याचा दबाव कमी होतो. मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते. हा प्रकार थांबला तर पाण्याचा दबाव वाढेल तसेच जलकुंभ वेळेत भरतील. म्हणजेच नळाच्या पाण्याचा दाबही वाढेल. त्यामुळे दुरुस्तीसाठी हे शटडाऊन हाती घेण्यात आले आहे.

शटडाऊन कशाला?
येथे करायची आहे पालिकेला दुरुस्ती

महानगरपालिकेच्या वतीने शटडाऊनच्या काळात शहरातील मोंढा नाका, मिल कॉर्नर, रेल्वेस्थानक, कैलासनगर येथे पाइपलाइन दुरुस्ती, तर मोठ्या पाइपलाइनवरील अनेक व्हॉल्व्ह दुरुस्त करायचे आहेत.
बातम्या आणखी आहेत...