आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणीपुरवठा विस्कळीत होऊ देणार नाही, महापालिका प्रशासनाची शहरवासीयांना ग्वाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - करार रद्द करण्याबाबतची नोटीस दिल्यानंतर ३० दिवसांचा कालावधी हातात असून त्यात ताबा घेतल्यानंतर पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी मनपाची यंत्रणा कामाला लागली असून पाणीपुरवठ्यात कसलाही अडथळा येणार नाही, अशी ग्वाही मनपा प्रशासनाने आज दिली.

साप्ताहिक आढावा बैठकीत महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, सभापती मोहन मेघावाले, विरोधी पक्षनेते अय्युब जहागीरदार, गटनेते भगवान घडामोडे, गजानन बारवाल यांनी करार रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर मनपाची किती तयारी आहे याची माहिती विचारली काय नियोजन केले आहे ते विचारले. कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल म्हणाले की समांतरला मनपाने जे कर्मचारी दिले अाहेत, ते मनपा घेणार आहे, वाॅर्डनिहाय त्यांची पथके तयार करण्यात येणार आहेत. शिवाय समांतरने विविध कामांसाठी नेमलेल्या ठेकेदारांकडून हातातील कामे पूर्ण करण्यात येतील. त्यांना त्यांच्या पैशाबाबत मनपाने हमी दिली आहे. याशिवाय पाणी शुद्धीकरणासाठी करावयाच्या रसायनांच्या खरेदीची लघुनिविदा काढण्यात आली आहे. तसेच टँकरचीही निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर शहर अभियंता सखाराम पानझडे म्हणाले की, देखभाल दुरुस्तीचे काम थांबणार नाही, ते तातडीने केले जाईल. तसेच योजना पुन्हा मनपाच्या ताब्यात आल्यानंतरची तयारी मनपा करीत आहे.
मूल्यांकन करणार
सध्याजी पाणीपुरवठा यंत्रणा आहे त्याचे मूल्यांकन करून देण्याबाबत मनपा आयुक्त बकोरिया यांनी जीवन प्राधिकरणाचे सचिव संतोषकुमार यांना विनंती केली आहे. मनपाने शुल्क भरावे आम्ही मूल्यांकन करून देऊ, असे सांगितल्याचे पानझडे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...