आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनीला गळती, १४ भागांत पाण्याचा ठणठणाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - फारोळा जलशुद्धी केंद्रात जलवाहिनीला गळती लागल्यामुळे बुधवारी शहरातील १४ भागांत पाणीपुरवठा होऊ शकला नाही. जानेवारीलाच समांतर कंपनीने देखभाल दुरुस्तीचे काम केले होते. त्या काळातही नागरिकांचे पाण्यावाचून हाल झाले होते.

बुधवारी पहाटे चार वाजता जुन्या ७०० व्यासाच्या जलवाहिनीला अचानक गळती लागली होती. पंपिंग सुरू असताना हा प्रकार घडल्याने तत्काळ पंपिंग बंद करण्यात आले. त्याच्या दुरुस्तीचे काम दिवसभर सुरू होते. चार वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर काही भागात पाणी सोडण्यात आले.

रात्री उशिरापर्यंत पाणी वितरण सुरू होते. ज्या भागाला पाणी देण्यात आले तेथे कमी दाब होता. अशा भागांत २० टँकर देण्यात आले. ज्या भागांना बुधवारी पाणी मिळू शकले नाही त्या भागात गुरुवारी पाणी देण्यात येईल, असे कंपनीचे जनसंपर्क अधिकारी राहुल मोतीयळे यांनी सांगितले. नागरिकांची फारशी गैरसोय झाली नाही, असे कंपनीचे ब्रँडिंग मॅनेजर अविक बिस्वास यांनी सांगितले.

या भागांना आज पाणी
बुधवारीज्या भागास पाणी मिळाले नाही त्यापैकी आलमगीर कॉलनी, मजनू हिल परिसर, रामनगर, काल्डा कॉर्नर, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, नाथपुरम, सहारा हार्मोनियम, समतानगर, नाथ व्हॅली, दत्तनगर, काश्मीरनगर, श्रीरंग सिटी, आनंद विहार परिसर येथे आज पुरवठा केला जाणार आहे.