आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळाचीदाहकता लक्षात घेता लातूर शहराला रेल्वेच्या ४६ वॅगनद्वारे पाणीपुरवठा करण्याचा विचार शासन करत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने चाचपणी करावी, अशी सूचना देण्यात आली आहे.

रेल्वे विभागानेदेखील त्यांच्याकडे वॅगनची उपलब्धता असल्याचे कळवले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी दिली. ही योजना अमलात आली तर एकाच वेळी कोटी लाख ३० हजार लिटर पाण्याची वाहतूक रेल्वेच्या माध्यमातून होणार आहे.

दांगट यांनी सांगितले की, पंढरपूरला रेल्वेने पाणी आणण्याबाबत चाचपणी केली जात आहे. प्रशासनाने पंढरपूरमध्ये पाहणी केली आहे. तेथील जलशुद्धीकरण केंद्रापासून ते लातूर रेल्वेस्थानकापर्यंत पाइपलाइन टाकावी लागणार आहे. एका वॅगनची क्षमता ५५ हजार लिटर इतकी आहे.

चाराछावण्यांना मंजुरी
लातूर,उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली. ११ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाच्या उपसमितीने मान्यता दिली होती. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी अंतिम मान्यता देण्यात आली आहे.