आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Water Supply Privatization,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुंठेवारीतील टँकर बंद; नागरिकांची तारांबळ, पाणीपुरवठ्याचे खासगीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पाणीपुरवठ्याचे समांतर योजनेत हस्तांतरण झाल्यानंतर हनुमाननगर, पुंडलिकनगर, जयभवानीनगर, बाळकृष्णनगर यासह इतर गुंठेवारी भागात पाण्याचे टँकर बंद झाले आहेत. त्यामुळे मागील पाच दिवसांपासून येथील नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. ३, ४ सप्टेंबरला "दिव्य मराठी' प्रतिनिधीने पाहणी केली असता, बहुतेक ठिकाणचे नागरिक टँकरच्या प्रतीक्षेत असल्याचे आढळले.
गुंठेवारी भागात तीन वर्षांपासून मनपाचे टँकर सुरू आहेत. पण नियमित येणारे टँकर अचानक बंद झाल्याने नागरिकांची तारांबळ उडत असल्याचे वृत्त "दिव्य मराठी'ने दोन सप्टेंबरला प्रकाशित केले होते. त्यानंतर दोन दिवसांनीही परिस्थिती बदलली नाही. नागरिकांना गरज भागवण्यासाठी जास्तीचे पैसे देऊन खासगी टँकर घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे. सध्या पाच हजार लिटरचे खासगी टँकर घेण्यासाठी ८०० रुपये तर दोन हजार लिटरच्या टँकरसाठी ३५० रुपये मोजावे लागतात. पाण्यावर अधिकचा खर्च केल्याने महिन्याचे बजेट बिघडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भगतसिंगनगर, हर्सूल या भागात तर मागील आठवड्यापासून पिण्याचे नियमित टँकरही आलेले नाहीत. जयभवानीनगर परिसरातील विश्रांतीनगर, पुंडलिकनगर आदी भागांतही टँकर येत नसल्याने नागरिक हैराण आहेत.
पाणीपुरवठ्याची जबाबदारी आमच्याकडे येऊन दोन दिवस झाले. गुंठेवारी भागात वेळेवर टँकर पोहोचले जात आहे. ज्या भागात मोफत टँकर असेल त्या भागात मोफत पाणी दिले जाईल. टँकर पोहोचणे आमची जबाबदारी आहे. नागरिकांनी ०२४०-६६५५००० या क्रमांकावर तक्रारी नोंदवाव्यात. राहुल मोतियेले, जनसंपर्क अधिकारी, एसीडब्ल्यूयूसीएल
अतिरिक्त खर्चाचा भार
तीन दिवसांपासून टँकर आलेले नाही. त्यामुळे खासगी टँकर मागवला. पैसे भरलेले असताना पाणी न मिळाल्याने अतिरिक्त खर्च करावा लागला. संतोष गायकवाड, जयभवानीनगर
हजारो रुपये जाताहेत
आम्ही पाणीपट्टी भरायला तयार आहोत, तरीही पाणी मिळत नाही. खासगी टँकर घेण्यासाठी महिन्याकाठी हजारो रुपये जात आहेत. प्रशासन, पदाधिका-यांनी अडचण सोडवावी. शकुंतला पाटील, बाळकृष्णनगर