आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवस पाण्याची ओरड, एक दिवसाने वेळापत्रक पुढे ढकलल्याने गॅपही वाढणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वीजयंत्रणेची देखभालीची कामे तसेच १४०० ७०० मिमी जोड जलवाहिनीवर उड्डाणपुलाखाली व्हाॅल्व्ह बसवण्याचे काम करण्यात येणार असल्याने येत्या मंगळवारी, २८ जुलै रोजी पाणीपुरवठ्याचे तासांचे मोठे शटडाऊन घेतले जाणार आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलण्यात येणार असल्याचे औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटी कंपनीने म्हटले असले, तरी प्रत्यक्षात पुढील किमान दोन दिवस शहरात पाण्याची ओरड राहण्याची शक्यता आहे.

मागील महिन्यात पाण्याची होणारी ओरड पावसामुळे काहीशी कमी झाली असली, तरी टंचाईचे भूत शहरवासीयांना सोडायला तयार नाही. आता देखभाल दुरुस्तीच्या तातडीच्या कामांमुळे मंगळवारपासून शहरवासीयांना पाण्याची टंचाई प्रकर्षाने जाणवणार आहे. तातडीच्या कामांसाठी मंगळवारी म्हणजे २८ जुलै रोजी सकाळी ते सायंकाळी असे तासांचे शटडाऊन घेण्याची घोषणा कंपनीने केली आहे.

कधीआणि कशासाठी? : मंगळवारीसकाळी ते या काळात शहराला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या नऊ तासांच्या काळात कंपनी विद्युत यंत्रणेवरील देखभालीची कामे घेणार आहे. तसेच रेल्वे फाटकाजवळ १४०० ७०० मिमी जोड वाहिनीवर उड्डाणपुलाखाली व्हाॅल्व्ह बसवण्यात येणार आहे. याच काळात शहरात इतर ठिकाणी म्हणजे एन-५च्या जलकुंभावरील ४०० मिमी मरिमाता जलकुंभावरील ५०० मिमी व्हाॅल्व्हच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.

काय होणार परिणाम?
यासंपूर्ण तासांच्या काम पूर्ण झाल्यास पुढे लांबू शकणाऱ्या शटडाऊनमध्ये शहराच्या दिशेने पाणी येणे बंद राहील. परिणामी, शहरात विविध भागांत २८ तारखेला सायंकाळी सहा वाजेनंतर होणारा पाणीपुरवठा होणार नाही. या शटडाऊनमुळे शहरातील पाण्याच्या टाक्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर भरण्यास सुरुवात होणार आहे.

पुरेसासाठा करून ठेवा
शटडाऊनमुळेपाणीपुरवठ्याचे वेळापत्रक दिवस पुढे ढकलण्यात येणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा. या काळात टँकरसेवाही प्रभावित होईल.