आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे पाणीपुरवठ्याचे तीनतेरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जायकवाडीतील नादुरुस्त ट्रान्सफाॅर्मरची दुरुस्ती सलग दुसऱ्या दिवशीही पूर्ण झाली नाही. हे काम शुक्रवारवर गेल्याने औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा कोलमडला आहे. सिडको, हडको, चिकलठाण्यासह शहराच्या सुमारे ५० टक्के भागाला याचा फटका बसला असून शनिवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे नाहीत.
जायकवाडीतील ट्रान्सफाॅर्मरमध्ये झालेल्या बिघाडामुळे शहराचा सुमारे ३५ टक्के पाणीपुरवठा कमी होत आहे. परिणामी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले आहे. सध्या पाचपैकी तीन पंपांद्वारेच पाण्याचा उपसा सुरू आहे. त्यावरच शहराची तहान भागवावी लागत आहे.
कायआहे समस्या ? : जायकवाडीतपाण्याचा उपसा करण्यासाठी पाच पंप आहेत. या पंपांना वीजपुरवठा करणारा एक ट्रान्सफाॅर्मर बुधवारी सकाळी (दि. २१) बिघडला. त्यावर चालणारे दोन पंप बंद पडले. त्यानंतर हा ट्रान्सफाॅर्मर बदलून दुसरा लावण्यात आला. पण त्यातील काॅइल गरम होऊ लागल्याने विजेचा दाब कमी-जास्त झाला. अशा स्थितीत हा ट्रान्सफाॅर्मर चालवणे धोकादायक असून त्याचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे लगेच तो बंद करण्यात आला.
सायंकाळनंतर त्याची दुरुस्ती शक्य नसल्याने ते काम शुक्रवारी केले जाणार आहे.

उपसा घटला
शहरासाठी दररोज २०० एमएलडीची गरज असतानाही १५५ एमएलडी पाणी उपसले जाते. या बिघाडामुळे पाण्याचा उपसा १०० ते १२० एमएलडीपर्यंत खाली आला. परिणामी सिडको, हडको भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. काही भागांत पाणी आलेच नाही, तर काही ठिकाणी विलंबाने कमी वेळ आले. तसेच मुकुंदवाडी, प्रकाशनगर, अंबिकानगर परिसरात सकाळचे पाणी दुपारी तीन वाजेनंतर आले.

दुरुस्ती संपेचना
गुरुवारी सकाळी ट्रान्सफाॅर्मर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. हेे काम मोठे असल्याने सायंकाळपर्यंतही ते पूर्ण होऊ शकले नाही. उद्या ते पूर्ण होणार अाहे. त्यानंतर चाचणी घेऊन सायंकाळपर्यंत पाणी उपसा सुरू होईल. त्यामुळे सध्या फक्त तीन पंपांवरूनच पाण्याचा उपसा सुरू आहे. मुख्य मोठ्या जलवाहिनीचा पुरवठा मात्र या बिघाडामुळे बंद आहे.

एन-७, अयोध्यानगर, एन-७ जी-१, जी-२, जी-३, एन-११ बी-१, बी-२,बी-३, एन-१२ डी स्वामी विवेकानंदनगर, सिद्धार्थनगर, हरिओमनगर, म्हसोबानगर, आॅडिटर हाउसिंग सोसायटी, हरसिद्धी सोसायटी, मोहन रेसिडेन्सी, एन-७ बी-१, बी-२, सी-१, एन-९ पवननगर, आंबेडकरनगर, राजे संभाजी काॅलनी, एन-११ ए, सुदर्शननगर, एन-७ श्रीकृष्णनगर, एन-१२ एफ सेक्टर, जी सेक्टर, सिद्धार्थनगर, एन-१ शिवछत्रपतीनगर, रोजाबाग, हाॅटेल ताजचा परिसर, मयूर पार्क, चिकलठाणा, संघर्षनगर, विठ्ठलनगर
बातम्या आणखी आहेत...