आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटोदा गावात मिळणार "एटीडब्ल्यू'द्वारे पाणी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त निर्मल ग्राम पाटोदा येथे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने अभिनव योजना राबवली आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी आता टँकर आता नळयोजनेला पाणी कधी येते याची प्रतीक्षा करावी लागणार नाही. त्यासाठी एटीडब्ल्यू अर्थात 'ऑल टाइम वॉटर' ही एटीएमच्या धर्तीवर योजना राबवून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. हे एक ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीन आहे. आमदार संजय सिरसाट यांच्या हस्ते या उपक्रमाचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. पिण्याच्या पाण्यासाठी एटीडब्ल्यू बसवणारी पाटोदा ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. या योजनेवर ग्रामनिधीतून सुमारे आठ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

पाटोदा ही ग्रुप ग्रामपंचायत असून ग्रामपंचायतीने राबवलेल्या विविध लोकाभिमुख उपक्रमांमुळे ती शासनाच्या लाखो रुपयांच्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या गावात ग्रामपंचायतीचा शंभर टक्के कर भरणाऱ्या ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात येतो. मुदतपूर्व एकरकमी कर भरणाऱ्यांचा विशेष भेटवस्तू देऊन सत्कार केला जातो. त्यांना ग्रामपंचायतीच्या गिरणीत मोफत दळण दळून दिले जाते. या शविाय ग्रामस्थांचा वाढदविस साजरा केला जातो. हद्दीतील गावांत ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. येथील आयएसओ नामांकनप्राप्त अंगणवाड्यांत सोलर शिपलर विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. गावात महिलांना समान संधी देण्यासाठी घरांवर त्यांची नावे टाकण्यात आली आहेत. गरोदर महिलांसाठी मदर केअर सेंटरही सुरू करण्यात आले आहे.
काय आहे एटीडब्ल्यू
गावाला औद्यागिक विकास महामंडळातर्फे पाणीपुरवठा केला जाताे. शविाय, ग्रामपंचायतीमार्फत हे पाणी िफल्टर करून ग्रामस्थांना पुरवठा केले जाते. आता हे पाणी नागरिकांना कार्डद्वारे वितरित करण्यासाठी ऑटोमॅटिक व्हेन्डर मशीन बसवण्यात आले. त्यासाठी ग्रामस्थांना स्वॅप कार्ड देण्यात आले आहेत. ज्यांना या सुविधेचा लाभ घ्यायचा त्यांनी ग्रामपंचायतीकडे पैसे भरून हे कार्ड रिचार्ज करून घेता येते. कार्ड स्वॅप केल्यानंतर ३ रुपयांत १० लिटर पाणी मिळणार आहे. त्यामुळे पाण्याची बचत होणार आहे. हे व्हेंडिंग एक लाख रुपयांत नांदेड येथील एक्सेस वॉटर कंपनीकडून मागवले आहे. या यंत्रणेसाठी उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्रावर सुमारे ७ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.
गाव हंडामुक्त करण्यासाठी घरपोच पाणी
गाव हंडामुक्त करण्यासाठी नळांना मीटर बसवल्यानंतर ग्रामपंचायतीने चारचाकीद्वारे घरोघर जाऊन अल्पदरात पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. ८ रुपयांत २० लिटर पाणी असा दर ठेवण्यात आला. या योजनेलाही ग्रामस्थांचा चांगला प्रतसिाद मिळत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. एटीडब्ल्यूच्या लोकार्पण कार्यक्रमाला सरपंच दत्तात्रय शहाणे, उपसरपंच हरिभाऊ मातकर,माजी सरपंच भास्करराव पेरे, ग्रामआर.डी.चौधरी, जिल्हा परिषद सदस्या योगिता बहुले,पंचायत समिती सदस्य गणेश नवले, देवचंद पेरे,कल्याण पेरे,सखाराम पेरे,वंदना पेरे,ज्योती पेरे दीपाली पेरे यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.