आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Supply Will Be Desultory In Many Areas On Wednesday.

पाण्याची बोंब सुरूच राहणार, जलकुंभ भरण्यास लागणार विलंब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दोन दिवसांपूर्वी फारोळा नक्षत्रवाडीत वीजपुरवठा खंडित झाल्याने विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या मार्गावर असतानाच आज पुन्हा एकदा नक्षत्रवाडीत चार तास वीजपुरवठा बंद राहिल्याने पाण्याची बोंब कायम राहणार आहे. बुधवारी अनेक भागांत पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.
आज नक्षत्रवाडी येथे महावितरणकडून होणारा वीजपुरवठा दुपारी साडेबारापासून खंडित झाला. थेट साडेचार वाजताच पुरवठा सुरू झाला. नक्षत्रवाडी येथील दोन्ही हर्सूल आणि वाळूज फीडर बंद होते. त्यामुळे ५६ एमएलडीचे जुनी पंपिंग सुमारे तासांसाठी बंद झाले. यामुळे यावरून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणम झाला. बुधवारी या वीज खंडाचा परिणाम शहराच्या काही भागांत जाणवणार आहे. तेथे पाणीपुरवठा कमी अथवा विलंबाने होण्याची शक्यता आहे, असे वाॅटर युटिलिटी कंपनीने कळवले आहे.
मागील एक महिन्यापासून शहराच्या पाणीपुरवठ्याचे तीनतेरा वाजले असताना कंपनीकडून काहीच सुधारणा होत नसल्याचे दिसत आहे. आज भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी आयुक्त प्रकाश महाजन यांची भेट घेतली त्यांना यात लक्ष घालण्याची विनंती केली. भाजपने आपली नेहमीची कंत्राट रद्द करण्याची मागणीही केली. तशी नोटीस द्या असेही ते म्हणाले. यावर आयुक्तांनी मनपाच्या सेवेतील कनिष्ठ अभियंत्यांना कंपनीच्या मदतीला देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले.
कंपनीने आपले काम व्यवस्थित करावे
मनपाच्या यंत्रणेतील या अभियंत्यांना पाणीपुरवठ्याची सगळी यंत्रणा माहीत असल्याने ते पुरवठा सुरळीत होण्यास मदत करू शकतील, असे ते म्हणाले. दुसरीकडे कंपनीनेही आपले काम व्यवस्थित पार पाडावे पाणीपुरवठ्यात अडचणी येऊ नयेत याची खबरदारी घ्यावी, अशा आशयाचे पत्र पाठवण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.