आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरातील २० हजार नागरिक पाण्याविना, सोमवारी ३९५ पैकी ६४ फे-या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहराचा पाणीपुरवठा सोपवलेल्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी लिमिटेड कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे सोमवार (१ सप्टेंबर) आणि मंगळवारी (२ सप्टेंबर) टँकरचे वितरण पूर्णपणे विस्कळीत झाले. पहिल्या दिवशी सोमवारी ३९५ पैकी फक्त ६४ फे-या , तर मंगळवारी २४३ फे-या च होऊ शकल्या. त्यामुळे ४० हजार लोकसंख्येपैकी २० हजार जणांना निर्जळी सहन करावी लागली.
"समांतर'ला पाणीपुरवठा हस्तांतरित केल्यानंतर "समांतर'च्या कंत्राटदार कंपनीने पंधरा वर्षांपासून मनपामार्फत सुरू असलेले ४७ टँकरचे काम बंद केल्याचे वृत्त मंगळवारी ह्यदिव्य मराठीह्णने प्रसिद्ध केले. पर्यायी व्यवस्था उभी करण्यास कंपनीला वेळ लागत असल्यामुळे नळ नसलेल्या भागातील लोकांना निर्जळी सहन करावी लागत आहे.
पाणीपुरवठा करणारी मनपाची तीन ठिकाणे असून दररोज टँकरच्या ३९५ फे-या केल्या जातात. कोटला कॉलनी, सिडको एन-५ आणि एन-७ येथून टँकर भरून नागरिकांना पाणी देण्याचे काम खासगी टँकरद्वारे केले जात होते. अमूल लॉरी सर्व्हिसेस अनेक वर्षांपासून या व्यवसायात असून त्यांचे ४७ टँकर बंद झाल्यामुळे पाणीपुरवठा अंशत: विस्कळीत झाल्याचे मंगळवारी निदर्शनास आले. कोटला कॉलनी येथून दररोज ९० फे-या होणे अपेक्षित असताना येथून सोमवारी फक्त २४ तर मंगळवारी ४१ फे-या झाल्या आहेत. एन-७ येथून दररोज ८० फे-या होतात. येथून पहिल्या दिवशी १० तर दुसऱ्या दिवशी २५ फे-या च पूर्ण होऊ झाल्या आहेत. एन-५च्या टाकीवरून दररोज २२५ फे-या केल्या जातात. येथून पहिल्या दिवशी ६० तर दुसऱ्या दिवशी १७७ फे-या पूर्ण होऊ शकल्या.

मंगळवारी "समांतर'च्या कंत्राटदार कंपनीने ३२ टँकरद्वारे ३९५ पैकी २४३ फे-या पूर्ण केल्या. १५५ फे-यांच्या कमतरतेमुळे पेठेनगर, पोलिस कॉलनी, माजी सैनिक कॉलनी, मिसारवाडी, साईनगर, हर्सूल व जटवाडा या भागांना पाणी मिळू शकले नाही.