आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुमारे दहा हजार घरगुती नळांना मीटर लागणारच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घरगुती नळांना मीटर बसवण्याऐवजी व्यावसायिक नळांना मीटर बसवण्यात यावे, अशी घोषणा महापािलकेच्या सर्वसाधारण सभेत केली गेली. मात्र समांतरच्या करारानुसार पहिल्या वर्षी दहा टक्के नळांना मीटर बसवणे बंधनकारक आहे. शहरात घरगुती नळांच्या तुलनेत व्यावसायिक नळांची टक्केवारी केवळ दोनच टक्के आहे. व्यावसायिक ८० नळांना मीटर बसवले गेले आहेत. करारानुसार दहा टक्के कोटा पूर्ण करण्यासाठी आणखी किमान दहा हजार घरगुती नळांना मीटर बसवावेच लागणार आहेत. त्यामुळे महापालिकेचा आदेश फसवा ठरला आहे.

शहरातील गल्लीबोळातील घरांना सध्या समांतरच्या उपकंत्राटदारांकडून मीटर बसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे पालिकेचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी मुख्य पाइपलाइन होत नाही तोपर्यंत मीटर बसवू नये, असा आग्रह स्थायी समितीच्या बैठकीसह सर्वसाधारण सभेत धरला होता. आयुक्त प्रकाश महाजन यांनी करारानुसार काम करावे लागणार असून नळांना मीटर बसवावेच लागतील, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे नगरसेवक पदाधिकारी आयुक्तांवर नाराज झाले होते. मात्र करारानुसार काम केल्यास कंत्राटदार मनपाला शासनाकडून जाब विचारला शकतो. त्यामुळेच मनपा प्रशासनाने मीटर बसवण्याच्या मोहिमेला ब्रेक लावता अनेक वस्त्यांमध्ये मीटर बसवण्याचे काम सुरूच ठेवले आहे.

नळ मीटर संख्या
शहरातअधिकृत घरगुती नळांची संख्या लाख हजार १३१, तर व्यावसायिक नळांची संख्या १९०० आहे. घरगुती नळांपैकी हजार ९० नळांना मीटर बसवण्यात आले आहेत. ही टक्केवारी दोन टक्के आहे. व्यावसायिक ८० नळांनाच मीटर बसविण्यात आले आहे. ही टक्केवारी केवळ ०.८० टक्के एवढी आहे. दोन्ही नळांना मीटर बसवण्याची टक्केवारी २.८० आहे. अधिकृत नळांची संख्या दीड लाखापेक्षा जास्त असली तरी अनधिकृत नळांची संख्या एक लाखावर आहे.

काय आहे करारात?
करारानुसारसमांतर कंत्राटदाराकडे योजना हस्तांतरित केल्याच्या पहिल्याच वर्षात शहरात दहा टक्के नळांना मीटर बसवणे आवश्यक आहे. दुसऱ्या वर्षात ४० टक्के तर तिसऱ्या वर्षात उर्वरित सर्व नळांना मीटर बसवणे अत्यावश्यक आहे. त्यानुसार मीटर बसवण्यास मनपाही प्राधान्य देत आहे.

पाच टक्केही मीटर नाहीत
नियमानुसारपहिल्या वर्षात दहा टक्के नळांना मीटर बसवणे आवश्यक आहे. मात्र पाच टक्के नळांनाही मीटर बसवले नाहीत. त्यामुळे दहा हजार घरगुती नळांना मीटर बसवावेच लागेल. राहुलमोतीयले, जनसंपर्कअधिकारी, समांतर
बातम्या आणखी आहेत...