आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Water Tank Break At Ajanta Cave Tourist Harassment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजिंठा लेणीतील पाण्याची टाकी फुटल्याने पर्यटक हैराण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा: जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असलेली सिन्टेक्स टाकी दोन दिवसांपूर्वी फुटली. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रविवारी लेणी पाहण्यासाठी आलेल्या दोन हजार पर्यटकांना लेणी पाहण्याऐवजी पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसले. यात आबालवृद्धांसह वरिष्ठांचे प्रचंड हाल झाले.
अजिंठा लेणीत 1 ते 26 लेणी आहेत. यातील लेणी क्र. 4, 8, 16 च्या समोर पर्यटकांना पिण्यासाठी पाण्याच्या चार सिन्टेक्स टाक्या आहेत. या टाक्यांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण फर्दापूर येथून पाणीपुरवठा होतो. या चार सिन्टेक्समधील दोन टाक्यांचे पाणी एमटीडीसीला जाते, तर दोन टाक्या पर्यटकांसाठी आहेत. विशेष म्हणजे एक टाकी तीन वर्षांपूर्वीच फुटली. तीदेखील अद्याप बदलली नाही. परिणामी पर्यटकांना एकाच टाकीवर तहान भागवावी लागत होती. मात्र, तीही तप्त उन्हाने फुटल्याने रविवारी लेणीला भेट देण्यासाठी आलेल्या दोन हजार पर्यटकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल झाले. सेवा शुल्क म्हणून पर्यटकांकडून पैसे आकारले जातात. मात्र त्या तुलनेत सुविधा मिळत नाहीत.
>मी आमच्या 15 सदस्यीय कुटुंबासह लेणी पाहण्यास आलो. यात पाच लहान मुले आहेत. तहान लागताच पाणी न मिळाल्याने लेणी अर्धवट पाहून घराकडे धाव घेत आहोत. अफरोज उमरखाँ, पर्यटक, जळगाव
>सेवाशुल्कानुसार येथे कोणत्याही सुविधा नाहीत. विशेष म्हणजे किमान पाण्याची तरी चांगली सुविधा मिळायला पाहिजे. मिलिंद तुकाराम तांबे, नागपूर
>पर्यटकांना पिण्याच्या पाण्यासाठी 15 हजार लिटरच्या दोन टाक्यांचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे दिलेला आहेत. अद्याप टाक्या आल्या नाहीत. डी. एस. दानवे, व्यवस्थापक, भारतीय पुरातत्त्व विभाग
>आमच्याकडे टाक्यांचा प्रस्ताव आला आहे. आम्ही तात्पुरती पर्यायी पाणीव्यवस्था सुरू करणार आहे. टाक्या उपलब्ध होताच बसवू. के.बी. यन्नावार, कनिष्ठ अभियंता, फर्दापूर