आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Tank Brought ; Citizen's Walking Not Stopping For The Water

चौथरे, तोट्यांसाठी पाण्याच्या टाक्या पडल्या ; नागरिकांची पाण्‍यासाठी फरपट चालूच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - टँकरद्वारे मिळणारे पाणी टाक्यांद्वारे वितरित करण्यासाठी ए टू झेड ग्रुपने दिलेल्या 300 पैकी 200 पाण्याच्या टाक्या चौथरे तयार करणे, तोट्या बसवणे आदी कामे न झाल्याने अडगळीत पडून आहेत.


दुष्काळात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व पाण्याचे व्यवस्थित वितरण करण्यासाठी पाण्याच्या टाक्या दिल्या जाव्यात याकरिता जिल्हा परिषद सदस्यांकडून सभागृहात अधिका-यांना धारेवर धरले जात होते. मात्र, आता 28 दिवसांपासून टाक्या गावांत पोहोचूनही त्या बसवण्यात आल्या नाहीत. परिणामी आजही लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य व ग्रामपंचायतींमध्ये समन्वय नाही. जि. प. सदस्यांकडून ग्रामपंचायतींवर खापर फोडले जात आहे.


तीनशे टाक्यांचे वितरण
ए टू झेड गु्रपकडून आतापर्यंत 300 टाक्या देण्यात आल्या आहेत. त्यांचे वितरणही गावांमध्ये करण्यात आले आहे. त्यानुसार गंगापूर तालुक्यातील अकरा गावांना
31 टाक्या मिळाल्या आहेत. औरंगाबादेतील 27 गावांना 111, तर वैजापूर तालुक्यात 37 टाक्यांचे वितरण करण्यात आले आहे.


लवकरच टाक्या लावू
दोन टाक्या मिळाल्या आहेत. त्याचे नियोजन सुरू असून लवकर त्या बसवल्या जातील.
ज्योती गायकवाड, सरपंच, वजनापूर, ता. गंगापूर


टाक्या मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आता त्या लावण्यासाठी ग्रामपंचायतीने नियोजन केले पाहिजे. ग्रामपंचायतीचे सरपंच ऐकतच नाहीत. अनिल चोरडिया, जि. प. सदस्य, वडगाव कोल्हाटी सर्कल


ही ग्रा. पं. ची जबाबदारी
गावापर्यंत पाण्याच्या टाक्या पोहोचवल्या आहेत. त्या बसवून घेण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतींची आहे.
सुखदेव बनकर, सीईओ, जिल्हा परिषद.


टाक्या पोहोचवल्या, पण टाक्या लावण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला असल्याने आम्हाला अडचण येत आहे.
संतोष जाधव, जि. प. सदस्य, सिल्लेगाव


लवकरच टाक्या बसवू
सध्या आम्हाला पाच टाक्यांची गरज आहे. मात्र दोनच टाक्या मिळाल्या आहेत. त्या कुठे लावाव्यात ही अडचण भेडसावत आहे. दोन-चार दिवसांत नियोजन करून टाक्या बसवू.
कल्याण खेडकर, उपसरपंच, बुट्टेवाडगाव, ता. गंगापूर